ब्रेकिंग
दिव्यातील तरुणाने निळजे उड्डाण पुलावर कंपनी व्यवस्थापकावर केला दगडाने हल्ला ,व्यवस्थापक गंभीर जखमी..
अमित जाधव - संपादक
0
2
0
9
7
4
मैत्रिणीच्या वादातून दिवा येथील एका तरुणाने कंपनीत काम करणाऱ्या एका व्यवस्थापकावर शुक्रवारी सकाळी पलावा चौक येथील निळजे उड्डाण पुलावर दगडाने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. हा प्रकार घडला तेव्हा हल्लेखोराची यापूर्वीची महाविद्यालयीन मैत्रीण व्यवस्थापकाच्या दुचाकीवर होती. गेल्या चार वर्षापासून दिवा येथील तरूण यापूर्वीच्या आपल्या महाविद्यालयीन मैत्रिणीने बोलावे म्हणून तिचा पाठलाग करत आहे. तिला विविध प्रकारे त्रास देत असल्याच्या तक्रारी मानपाडा पोलीस ठाण्यात आहेत घटनेचा पुढील तपास करत असून हललेखोराची चौकशी करून कारवाई करण्यात येईल असे यावेळी कळविण्यात आले.
0
2
0
9
7
4



