बेधडक ठाणे न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

गुरुपौर्णिमेनिमित्त मातोश्रीवर शिवसेना प्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांना मशाल भेट..

अमित जाधव - संपादक

गुरुपौर्णिमेच्या पवित्र आणि प्रेरणादायी दिवशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांची भेट घेण्याचा सन्मान आज “मातोश्री” निवासस्थानी मिळाला. या प्रसंगी डोंबिवली विधानसभा संपर्कप्रमुख प्रकाश वाणी यांनी उद्धवसाहेबांना संघर्षाची, शक्तीची आणि मार्गदर्शनाची प्रतीक असलेली “मशाल” भेट म्हणून अर्पण केली.

ही मशाल केवळ एक भेटवस्तू नसून, ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली पेटलेल्या लढ्याच्या आणि असंख्य कार्यकर्त्यांच्या श्रद्धेच्या ज्वाळेचे प्रतीक आहे. या भेटीदरम्यान कल्याण लोकसभा संपर्कप्रमुख गुरुनाथ खोत आणि कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख रोहिदास मुंडे हे मान्यवर देखील उपस्थित होते.
गुरुपौर्णिमा ही गुरुंच्या साक्षीने प्रेरणा घेण्याचा दिवस असतो. उद्धवसाहेब हे आमच्या राजकीय जीवनातील दीपस्तंभ असून त्यांचं विचारसरणी, संयम, आणि संघर्षाचा वारसा आम्हा सर्व कार्यकर्त्यांना नेहमीच मार्गदर्शन करत राहतो.
आज मातोश्रीवरची ही भेट ही आमच्यासाठी एक नवा उत्साह, नवी ऊर्जा आणि नव्या लढ्याची सुरुवात ठरेल.
पक्ष आणि विचारप्रवाहासाठी आमची निष्ठा ही मशालप्रमाणे अखंड तेजस्वी राहील, अशी हमी या दिवशी आम्ही पुनः एकदा घेतली. यावेळी कल्याण लोकसभा संपर्कप्रमुख व उपनेते गुरुनाथ खोत कल्याण जिल्हा संघटक तात्यासाहेब माने कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख रोहिदास मुंडे सदाशिव गायकर विधानसभा संघटक तालुका संघटक भगवान पाटील उपतालुकाप्रमुख परेश पाटील नवनीत गायकर आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे