ब्रेकिंग
शिक्षणाची चाकोरी बदलणारी शाळा! म्हणजे दिव्यातील पब्लिक स्कूल!तांत्रिक, व्यवसायिक, कौशल्याची जोड!..
अमित जाधव - संपादक

ठाणे -द्रोणाचार्य फाऊंडेशन संचलित पब्लिक स्कूल दिवा खऱ्या अर्थाने दिवा सारख्या भागात, शिक्षणातून प्रगतीकडे हा मंत्र घेऊन, तांत्रिक, व्यवसायिक, कौशल्याचे धडे आपल्या कार्यातून विद्यार्थ्यांना देत आहे. ईयत्ता १पहिली ते १० वी. पर्यंत एकूण 800. विद्यार्थी – विद्यार्थीनी शैक्षणिक धोरणानुसार, दैंनंदिन शिक्षणाचे धडे घेतं आहेत.गेले सात आठ वर्षांपासून, द्रोणाचार्य फाऊंडेशनचे संस्थापक श्री. विनोद पाटील सर यांच्या, विविध प्रयोगशील उपक्रमाने विद्यार्थ्यांना, विद्यार्थी दशेमध्येच उद्योगाशिलतेचे धडे देत असून, त्यामुळे शिक्षणा बरोबरच, विद्यार्थ्यांना आवड असलेल्या विषयांची रुची स्पष्ट होत आहे.*
शाळा म्हणजे नुसतेच दप्तर, पाटी- पेन्सिल, वही -पुस्तके हे पारंपरिक ओझे विद्यार्थ्यांच्या डोक्यावर किंवा पाठीवर लादू नये. या पारंपारीक शिक्षणाच्या जोखडातून विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता आणि व्यवसायिक प्रोहत्सान देऊन त्यांची कौसल्यात्मक क्षमता वाढविली.यासाठी शिक्षक, पालक आणि विद्यार्थी यांच्या अमुलाग्र सहकार्यातून हा बदल घडून आला आहे “आरंभ”या उपक्रमाद्वारे विद्यार्थीनी यांना पाककला शिकविली जाते. त्यासाठी त्या त्या पाककलेतील नामवंत कूक यांना आमंत्रित केले जाते.तसेच नामांकित फाईव्ह स्टार हॉटेलची सफर घडवून,त्यांना प्रॅक्टिकली धडे दिले जातात. यासाठी ताज सारखी मोठ मोठी हॉटेल्स आमंत्रित करतात. याच उपक्रमाचा भाग म्हणून बालदिन या दिवशी ताजं हॉटेल मॅनेजमेंटने ती संधी दिली. तसेच याच उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीचे धडे देऊन, त्यांना जवळील औद्योगिक क्षेत्रातील विविध कंपनींची सफर घडवून, उद्योग आणि उद्योगाशी निगडीत असणारी मशिनरी यांचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात येते. घरगुती विजेशी संबंधित जी उपकरणे असतात, त्यांची दुरुस्ती आणि देखभाल कसे करावे,यांचे सेमिनार आयोजित करून, शिक्षणं दिले जाते. आरंभच्या माध्यमातुन संस्थेचा पुढील टप्पा म्हणून ,”रोबोटिक” शिक्षणं देण्याचा मानस आहे. असे संस्थापक विनोद पाटील यांनी स्पष्ट केले.