Breaking
ब्रेकिंग

दिवा मनसे शिष्टमंडळाने शाळेच्या जादा आकरलेल्या फि संदर्भात मध्यस्थी केल्यामुळे पालकांना दिलासा…

अमित जाधव-संपादक

0 2 0 9 7 4

दिव्यातील गणेश विद्या मंदिर या शाळेत थकीत फी असणाऱ्या पालकांना शाळेकडून दंड आकारण्यात येत असल्याची तक्रार काही पालकांनी मनसे मध्यवर्ती कार्यालयात केली होती. त्यानुसार दिवा शहर अध्यक्ष श्री.तुषार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक २० सप्टेंबर रोजी मनसे शिष्टमंडळाने शाळा संचालकांची भेट घेऊन चर्चा केली. कोरोना काळापासून ज्या पालकांच्या फि बाकी आहेत त्यांच्या साठीच हे दंड लावण्यात आल्याचे शाळेकडून सांगण्यात आले. फि न भरल्याने शाळेची होणारी आर्थिक अडचण संचालकांनी बोलून दाखवली,  शाळा आणि पालक दोघांची बाजू समजून घेतल्यानंतर किमान 30 ऑक्टोबर पर्यंत पालकांकडून दंड न आकारण्याचा तोडगा काढण्यात आला. ज्याला पालक आणि शाळा दोघांनी मान्यता दिली.

यावेळी शिष्टमंडळात दिवा मनसेचे शहर सचिव प्रशांत गावडे, मनविसे विभाग अध्यक्ष कुशाल पाटील, उपविभाग अध्यक्ष परेश पाटील,सोपान जाधव, शाखाध्यक्ष शैलेंद्र कदम, धनेश पाटील,आकाश भारती, गौरव कदम हे पदाधिकारी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे