बेधडक ठाणे न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

क्रिडा व मनोरंजनगुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

रिपब्लिकन पक्षाच्या मुंबई प्रदेश अध्यक्षपदी सिद्धार्थ कासारे यांची नियुक्ती – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले…

अमित जाधव-संपादक

रिपब्लिकन पक्षाच्या मुंबई प्रदेश अध्यक्षपदी सिद्धार्थ कासारे यांची नियुक्ती – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

 

मुंबई संजय बोर्डे

रिपब्लिकन पक्षाच्या मुंबई प्रदेश अध्यक्षपदी रिपाइं चे ज्येष्ठ निष्ठावंत कार्यकर्ते सिद्धार्थ कासारे यांची आज अटीतटीच्या निवडणुकीत निवड करण्यात आली. असल्याची अधिकृत घोषणा रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी केली.

रिपाइं च्या मुंबई प्रदेशच्या नवनिर्वाचित कार्यकारीणीच्या अध्यक्ष पदी  सिद्धार्थ कासारे; कार्याध्यक्ष पदी बाळासाहेब गरुड; सरचिटणीस पदी विवेक गोविंदराव पवार; कोषाध्यक्ष पदी  सुनील बन्सी मोरे यांची नियुक्ती आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय  राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी  अधिकृत जाहीर केली.

यावेळी रिपाइं युवक आघाडी च्या मुंबई अध्यक्ष पदी रमेश गायकवाड आणि युवक आघाडी मुंबई सरचिटणीस पदी सचिन मोहिते यांनी निवड जाहीर करण्यात आली तसेच रिपब्लिकन झोपडपट्टी महसंघ महाराष्ट्र  अध्यक्ष पदी सुमित वजाळे यांची नीवड करण्यात आली. तसेच रिपाइं च्या  राज्य कमिटीच्या उपाध्यक्ष पदी प्रकाश मोरे आणि राज्य सचिव पदी हरिहर यादव यांची निवड यावेळी केंद्रीय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी  जाहीर  केली.

रिपब्लिकन पक्षाच्या मुंबई प्रदेश कार्यकरिणी निवडणूकीचे कामाची जबाबदारी  रिपाइं चे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस गौतम सोनवणे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सांभाळली.

यावेळी रिपाइं चे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर; रिपाइं चे  महाराष्ट्र राज्य अध्यक्ष राजाभाऊ सरवदे  ; रिपाइं युवक आघाडी महाराष्ट्र अध्यक्ष पप्पू कागदे;;एम एस नंदा आदींच्या उपस्थितीत रिपाइं च्या मुंबई प्रदेश कार्यकारीणी ची निवड करण्यात आली.

रिपाइं च्या मुंबई प्रदेश अध्यक्ष पदासाठी १३ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. त्यातुन मुंबई अध्यक्ष पद आणि कार्यकरिणी नियुक्तीचे सर्वाधिकार रिपाइं चे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांना या बैठकीत देण्यात आले. त्यानंतर ना.रामदास आठवले यांनी रिपाइं च्या मुंबई अध्यक्षपदी  सिद्धार्थ कासारे यांची;मुंबई प्रदेश कार्याध्यक्षपदी  बाळासाहेब गरुड आणि मुंबई प्रदेश सरचिटणीस पदी विवेक गोविंदराव पवार; मुंबई प्रदेश  कोषाध्यक्ष पदी सुनील बन्सी मोरे यांची आज अधिकृत नियुक्ती जाहीर करण्यात आल्याची अधिकृत घोषणा रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी आज केली.सांताक्रूझ पूर्व कालिना  भीमछाया सांस्कृतिक केंद्र येथील सभागृहात आज रिपब्लीकन पक्षाच्या मुंबई प्रदेश कार्यकरिणीची निवडणूक  मोठया उत्साहात आणि प्रचंड गर्दीत पार पडली.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे