पंत वालावलकर शाळेत आषाढी निमित्त दिंडीचे आयोजन
मुंबई – गणेश हिरवे
आषाढी एकादशीच्या निमित्ताने शांताराम कृष्णाजी पंतवालावलकर माध्यमिक विद्यालय नेहरू नगर कुर्ला पूर्व या शाळेच्यावतीने विद्यार्थी, शिक्षक व पालक यांची दिंडी निघाली होती.या पालखी सोहळ्यामध्ये संस्थेचे सचिव सत्येंद्र सामंत, शाळेचे मुख्याध्यापक श्री.महादेव यादव, उपमुख्याध्यापिका ज्योती नेमाडे, पर्यवेक्षक धुळाजी दडस, पाटीलबुआ पाचारणे, सतीश शिंदे, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक वर्ग व ५०० हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते.या पालखी सोहळ्यामुळे नेहरू नगर कुर्ला परिसर भक्तिमय वातावरणाने व ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम या जयघोषाने दुमदुमला. विद्यार्थ्यांनी जनजागृती करण्याचे कार्य केले.विद्यार्थ्यांनी ठीक ठिकाणी चौकांमध्ये गोल रिंगण करून व शिक्षक, विद्यार्थी व पालक यांनी भजनाच्या तालावर फेर धरून फुगड्या खेळाचा आनंद लुटला.


