
शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गावाबाहेरील मतदारांची यादी तयार करा, त्यांना आणण्यासाठी गाड्या पाठवा, फोन पे करा, असे बांगर यांनी म्हटल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यावर माझे वक्तव्य एडीट करून व्हायरल करण्यात आले, असे बांगर यांनी निवडणूक आयोगाला म्हटले होते. मात्र तरीही त्यांच्या या विधानावरून कळमनुरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.