दिवा येथे सोशल मीडियावरील पोस्ट प्रकरण, अखेर केला माफीनामा सादर..
दिवा :CJI. गवई यांच्या संदर्भात सोशल मीडियावर चप्पल फेकीचे समर्थन करणारी पोस्ट चुकीने आपल्या अकाउंटवरून प्रसारित झाल्याबाबत दिवा येथील अॅड. बिपीनकुमार दुबे यांनी माफी मागितली आहे.या संदर्भात त्यांनी पोलीस स्टेशनला लेखी माफीनामा सादर करून, अशा प्रकारची घटना पुन्हा होणार नाही अशी ग्वाही दिली.
सदर प्रसंगी समाजातील विविध घटक उपस्थित होते — समाजसेवक बालाजी कदम, पँथरचे संदीप जाधव, प्रफुल तांबे, (पँथर सेना) युवा नेते विनोद भालेराव, आठवले गटाचे सौरव आढागले, तसेच कपिल रोडे, रवी कदम, संभाजी कदम,राहुल शिंदे,बनसोडे बाबा, समाजसेविका सरला गायकर,माने मॅडम, अमोल जाधव, कुमार भालेराव, कांबळे बाबा आणि इतर साजसेवक आणि मान्यवर उपस्थित होते.
पोस्टमुळे दोन गटांमध्ये सामाजिक तेढ निर्माण होण्याची शक्यता होती. मात्र, समाजातील सर्व घटकांनी सामाजिक सलोखा राखण्याचे आवाहन करून शांततेचा संदेश दिला.



