Breaking
ब्रेकिंग

श्रद्धा वाळकर खून प्रकरण,श्रद्धा चे मुंडके तलावात फेकल्याचा अंदाच,दिल्ली पोलिसांनी अख्खा तलाव खाली करण्याचे दिले आदेश….

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 8

महाराष्ट्रातील पालघर येथील रहिवासी असणाऱ्या श्रद्धा वालकर या तरुणीच्या खूनाने संपूर्ण देश हादरला आहे. मृत श्रद्धाचा प्रियकर आफताब पूनावाला याने सहा महिन्यापूर्वी श्रद्धाचा निर्घृण खून केला आहे. आरोपीनं श्रद्धाच्या शरीराचे सुमारे ३५ तुकडे करून जंगलाच्या विविध भागात फेकले आहेत. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी आरोपीला अटक केली असून श्रद्धाच्या शरीराचे तुकडे गोळा करण्याचं काम केलं जात आहे.
दिल्ली पोलिसांनी आतापर्यंत श्रद्धाच्या शरीराचे १७ तुकडे गोळा केले आहेत. हे सर्व तुकडे फॉरेन्सिक चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत. यानंतर आता या हत्येप्रकरणातील मोठी अपडेट समोर आली आहे. आरोपीनं श्रद्धाचं शिर मैदान गढी येथील तलावात टाकल्याची माहिती पोलिसांना दिली आहे. यानंतर पोलिसांनी रविवारी मैदान गढी येथील तलाव रिकामा करायला सुरुवात केली आहे व लवकरच संपूर्ण प्रकरणाचे गूढ उकलले जाईल असे स्पष्ट केले

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे