दिवा पश्चिमेतील स्मशान भूमी पाण्याविनाच…* *भाजप युवा मोर्चाचे सतीश केलशीकर दिवा प्रभाग समितीवर धडक देत दिला आंदोलनाचा इशारा.
अमित जाधव - संपादक

दिवा ता १ ऑगस्ट : दिवा पश्चिमेतील स्मशानभूमीची दुरावस्था ‘पाण्याविना हाल ‘ झाली असल्याचे पहावयास मिळत आहे. गळके छप्पर असलेल्या व अस्वच्छता असल्याने स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांचे गैरसोय होत आहे. वेळोवेळी पाठपुरावा करून सुद्धा ठाणे महापालिका अंतर्गत दिवा प्रभाग समिती दुर्लक्ष करून वेळकाढू पणा करत आहे यामुळे नागरीकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. स्मशानभूमीची डागडूजी करण्याची मागणी गेल्या अनेक महिन्यांपासून केली जात होती.या स्मशानभूमीच्या सुशोभिकरणासाठी निधी मंजूर झाला, स्मशानभूमीच्या सुशोभीकरणाचे काम सुरू करण्यात आले होते मात्र सदर कामात अडथळा का ? व कश्यामुळे निर्माण झाला आहे यामुळे त्रिव् नाराजी व्यक्त करत निदान बोअरवेल मारून द्यावी अशी मागणी करत दिवा भाजप मंडल अध्यक्ष सचिन भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप युवा मोर्चाचे सतिश केळशीकर यांनी पुन्हा दिवा प्रभाग समिती धडक देत निवेदन देऊन स्मशाभूमीतील दुरवस्था व पाणी टंचाई दूर झाली नाही तर आंदोलनाचा इशारा दिला आहे
या स्मशानभूमीत गळक्या छतामुळे तेथे अंत्यसंस्कारासाठी आणण्यात येणाऱ्या मृतदेहासह अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. पाणी टंचाईग्रस्त दिव्यात स्मशानभूमीत देखील पुरेसं पाणी उपलब्ध नसल्याने तसेच सरणावरच्या चौथऱ्यावर गळक्या छप्परमुळे ठेवण्यात आलेल्या लाकडावर प्लास्टिक कागद टाकून ते झाकण्यात येत आहे हा प्रकार पाहून त्याबद्दल केळशीकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दिवेकरांसाठी सदर लाजिरवाणी बाब दिसून येते असून अनेक जेष्ठ नागरिकांनीही संताप व्यक्त केला आहे. प्रकरणी नागरिकांनी स्थानिक लोकप्रतिनिधी व ठाणे महापालिका प्रशासनावर तीव्र नाराजी दर्शवली आहे.