Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

मानवाधिकार परिषदेच्या महाराष्ट्र राज्य प्रदेश महिला सचिव अश्विनी भालेराव यांचा सुस्त्य उपक्रम,येऊर येथील अनाथ आश्रमात मुलांना कपडे व इतर वस्तूंचे वाटप……..

अमित जाधव-संपादक

0 2 0 9 7 4

मानवाधिकार परिषदेच्या महाराष्ट्र राज्य प्रदेश महिला सचिव अश्विनी भालेराव यांचा सुस्त्य उपक्रम….

ठाण्यातील येऊर येथील विवेकानंद बालकाश्रम मधील अनाथ मुलांना “न्यायिक मानवाधिकार परिषदेच्या महाराष्ट्र राज्य प्रदेश महिला सचिव अश्विनी भालेराव यांच्यातर्फे कपड्यांचे वाटप करण्यात आले.” खाऊ किंवा इतर वस्तूंचे वाटप करून काही तास किंवा एक दिवसाची मदत न करता काहीतरी नवीन करूयात या कल्पनेने हे कपडे वाटप करण्यात आले.

कोरोना काळात विवेकानंद बालकाश्रम च्या संचालिका प्राची कसबेकर व व्यवस्थापक सुदाम जळे यांनी लहान मुलांना कोरोनाचा कोणताही त्रास होऊ नये याबद्दल खूप मोठी खबरदारी घेत बालकाश्रम मधील लहान मुलांची काळजी घेतली.त्यांच्या या कार्याबद्दल न्यायिक मानवाधिकार परिषदेतर्फे संचालिका प्राची कसबेकर व व्यवस्थापक सुदाम जळे यांना कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

विवेकानंद बालकाश्रम च्या संचालिका प्राची कसबेकर व व्यवस्थापक सुदाम जळे तसेच तेथील लहान मुलांनी न्यायिक मानवाधिकार परिषद आणि न्यायिक मानवाधिकार परिषदेच्या महाराष्ट्र राज्य प्रदेश महिला सचिव अश्विनी भालेराव यांचे आभार व्यक्त केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे