ब्रेकिंग
फाउंटन हॉटेलजवळ वर्सोवा खाडीपाशी झालेल्या दुर्घटनेत जेसीबीसह अडकलेल्या मजुराच्या कुटुंबीयांस मुख्यमंत्री यांच्याहस्ते ५० लाख रुपये मदतीचा धनादेश..
अमित जाधव - संपादक
फाउंटन हॉटेलजवळ वर्सोवा खाडीपाशी झालेल्या दुर्घटनेत जेसीबीसह अडकलेल्या मजुराच्या कुटुंबीयांस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते ५० लाख रुपये मदतीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. राकेश यादव यांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्र्यांच्या ठाणे येथील निवासस्थानी बोलावून त्यांना हा धनादेश देण्यात आला. तसेच राकेश यांच्या भावाला नोकरी देण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री यांनी वर्सोवा खाडीजवळील घटनास्थळाला भेट दिली होती. पीडित कुटुंबीयांचे सांत्वन केले होते. तसेच मदतीनिधीची घोषणा केली होती. त्यानुसार, ही मदत करण्यात आली आहे. यावेळी राकेश यांच्या पत्नी सुशीला यादव, वडील बालचंद्र यादव, मुली रिशु आणि परी यादव, मुलगा रिंकू यादव आणि भाऊ दुर्गेश यादव तसेच, एमएमआरडीएचे सह- आयुक्त राधबिनोद शर्मा, एमएमआरडीएचे मुख्य अभियंते चामलवार, एमएमआरडीएचे वरिष्ठ अभियंते हनुमंत सोनवणे, एल अँड टीचे प्रकल्पप्रमुख कॉलिन, माजी नगरसेवक एकनाथ भोईर उपस्थित होते