Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

दिव्यात मोठ्या उत्साहात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी,दिव्यातील तमाम बौद्ध बांधवांच्या सहकार्याने भव्यदिव्य मिरवणूक

अमित जाधव-संपादक

0 2 0 9 7 4

दिव्यात मोठ्या उत्साहात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी……

दिव्यातील तमाम बौद्ध बांधवांच्या सहकार्याने भव्यदिव्य मिरवणूक

दिव्यात ठीक ठिकाणी मोठ्या उत्साहात विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वि जयंती साजरी करण्यात आली.दिव्यातील तमाम बौद्ध बांधवांनी बाबासाहेबाना पुष्पहार अर्पण करण्यासाठी रात्री 12 पासूनच सुरवात केली १४ एप्रिल हा आनंदाचा दिवस सर्व ठिकाणी आनंदमय वातावरणात जयंती साजरी होत असताना अनेक ठिकाणी मोफत आरोग्य शिबीरे मंडळांनी आयोजित केली होती तसेच एक गाव ,एक शहर,एक मिरवणूक या उद्देशाने दिवा शहरात तमाम बौद्ध बांधवांनी एकत्रित येत संयुक्त सार्वजनिक जयंती उत्सव मंच च्या माध्यमातून भव्यदिव्य मिरवणुकीच आयोजन करून संपूर्ण शहरात मिरवणूक काढण्यात आली यात मोठ्या प्रमाणावर बौद्ध बांधव,महिला वर्ग,जैष्ठ वर्गाचा समावेश होता तसेच दिव्यातील सर्व राजकीय पक्षांनी देखील मिरवणुकीत सहभाग नोंदवत उपस्थिती दाखवली भव्य दिव्य मिरवणुकीत संपूर्ण दिवा शहर निळ्या रंगाने न्हाहून निघाले होते इकडे तिकडे बाबासाहेबांच्या नावाचा जयजयकार होत होता डीजेच्या तालावर प्रचंड बौद्ध जनसमुदाय थिरकत होता.
सम्यक समता मंडळ व महिला वर्ग,सम्यक बुद्ध विहार व पद्धधिकारी,संघर्ष युवा मित्र मंडळ,विश्वप्रज्वल महिला मंडळ,दीपक जाधव मित्र मंडळ,
व इतर राजकीय पक्षाच्या आजी माजी नगरसेवक वैगेरे मिरवणुकीत सहभागी झाले होते रात्री दहाच्या सुमरास मिरवणुकीची सांगता झाली

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे