बेधडक ठाणे न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

आरोग्य व शिक्षणकृषिवार्तागुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

⭕️मुंबईतील बोरिवली भागात अभियंत्याच्यl कारवर भरदिवसा गोळीबार…….

अमित जाधव-संपादक

*⭕️मुंबईतील बोरिवली भागात अभियंत्याच्यl कारवर भरदिवसा गोळीबार……

संतोष पडवळ-कार्यकारी संपादक

मुंबई, ता 29 : बोरिवलीत संजय गांधी नॅशनल पार्कसमोर गोळीबाराची घटना समोर आली आहे. संबंधित घटना ही आज (२९ सप्टेंबर) संध्याकाळी सहा ते साडेसहाच्या सुमारास घडली. गोळीबार करणारे आरोपी हे दुचाकीने आले होते. त्यांच्याजवळ काळ्या रंगाची दुचाकी होती. त्या दुचाकीची पेट्रोलची टाकी ही लाल रंगाची होती. त्यांनी नॅशनल पार्कबाहेर एका कारवर गोळीबार केला. गोळीबाराच्या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. काही नागरिकांनी तातडीने पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पण तोपर्यंत आरोपी हे फरार झाले होते.

बोरिवलीत संजय गांधी नॅशनल पार्कबाहेर संध्याकाळी सहा ते साडेसहाच्या दरम्यान एका पांढऱ्या रंगाच्या कारवर दोन अज्ञात आरोपींकडून गोळीबार करण्यात आला. गोळीबार करणारे हे आरोपी हे दुचाकीवरुन आले होते. त्यांनी पांढऱ्या रंगाचा रेनकोर्ट घातलेला होता. आरोपी गोळीबार करुन फरार झाले. पण या गोळीबारात कुणीही जखमी झाले नसल्याची बातमी समोर आली आहे. ज्या गाडीवर गोळीबार झाला ती गाडी मीरा भाईंदर येथील बांधकाम विभागाच्या एका कार्यकारी अभियंत्याची आहे. त्याचं दीपक खाम्बित असं नाव आहे. दीपक खाम्बित हे सुखरुप आहेत. या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

पोलिसांनी केलेल्या तपासात महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. दीपक यांच्या कारवर २ राउंड फायरिंग केली गेली आहे. पण पोलिसांना आतापर्यंत एकच गोळी मिळाली आहे. दुसऱ्या गोळीचा शोध अद्यापही सुरुच आहे. ज्यावेळी दीपक यांच्यावर हल्ला झाला त्यावेळी ते मीरा भाईंदर महापालिकेतून आपल्या बोरिवली येथील घरी कारने जात होते.

दीपक यांच्या गाडीने नॅशनल पार्कच्या ब्रिजच्या खालून घरी जाण्यासाठी युटर्न घेतला त्याचवेळी ब्रिजखाली बसलेल्या दोन अज्ञात आरोपींनी कारवर गोळीबार केला. पण सुदैवाने दीपक बचावले. ते सुखरुप आहेत. आरोपींनी पांढऱ्या रंगाचा रेनकोर्ट घातलेला होता. त्यामुळे त्यांचा चेहरा दिसला नाही. तसेच दीपक यांची गाडी त्यावेळी ड्रायव्हर चालवत होता.

बोरिवलीत ज्या भागात ही गोळीबाराची घटना घडली त्या परिसरात साधारणत: टूर अँड ट्रॅव्हल्सचे कार्यालये सर्वाधिक आहेत. घटनास्थळावर या घटनेचे साक्षीदार असलेल्या काही लोकांच्या माहितीनुसार ही घटना संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास घडली, असा त्यांचा अंदाज आहे. ते आपलं काम करत असताना अचानक गोळीबाराचा आवाज आला. ते आपलं काम सोडून रस्त्यावर बाहेर आले तोपर्यंत आरोपी फरार झाले होते. पण कारचा काच फुटलेला होता. गाडीत त्यावेळी ड्रायव्हर आणि त्या गाडीचा मालक असे दोनच माणसं होती, अशी देखील माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे, असंही त्यांनी सांगितलं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे