बेधडक ठाणे न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

आरटीई’ प्रवेशासाठी २४ मार्च पर्यंत कागदपत्र पडताळणी,कागदपत्र पडताळणीसाठी शिक्षणाधिकारी यांचे पालकांना आवाहन… 

अमित जाधव - संपादक

ठाणे)- जिल्ह्यातील बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार, दरवर्षीप्रमाणे २५ टक्के प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येत आहे. मंगळवारी, दि. १८, मार्च २०२५ रोजी प्रतिक्षा यादी टप्पा क्रमांक ०१ मधील २ हजार ७०५ विद्यार्थ्यांचे प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली असून प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांच्या पालकांना टेक्स्ट मेसेज (SMS) पाटविण्यात येत आहे.

पालकांनी केवळ टेक्स्ट मेसेज (SMS) वर अवलंबून न राहता RTE PORTAL वरील ‘अर्जाची स्थिती’ या टॅबवर आपल्या बालकांचा अर्ज क्रमांक टाकून अर्जाची स्थिती पहावी, तसेच वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे अवलोकन करावे. प्रतिक्षा यादीतील बालकांच्या पालकांनी अलोटमेंट लेटर व आवश्यक कागदपत्रे घेऊन विहित मुदतीत नजिकच्या पडताळणी केंद्रावर जाऊन पडताळणी समितीकडून दि. २४ मार्च, २०२५ रोजीपर्यंत कागदपत्रांची तपासणी करून आपल्या बालकांचा ऑनलाईन प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाळासाहेब राक्षे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे