Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

ऑनलाईन शॉपिंगच्या माध्यमातून फसवणूक करणारी सराईत गुन्हेगारांची टोळी…

अमित जाधव--संपादक

0 2 0 9 7 4

*⭕️ऑनलाईन शॉपिंगच्या माध्यमातून फसवणूक करणारी सराईत गुन्हेगारांची टोळी जेरबंद…*

ठाणे, ता 7 जाने ( संतोष पडवळ) : – फ्लिपकार्ट या ऑनलाईन शॉपिंगच्या माध्यमातून खोटे पत्ते देऊन कॅश ऑन डिलेव्हरी पर्यायाने बुकिंग केलेली पार्सल घेताना बिलापेक्षा कमी रक्कम मोजण्याकरीता देऊन, पार्सल घेऊन हातचलाखीने पार्सल मधील किंमती वस्तू काढून त्याच्या जागी साबणाची वडी ठेऊन; पार्सल परत करून फसवणूक करणाऱ्या सराईत त्रिकुटांच्या टोळीला कासारवडवली पोलिसांनी अटक करून सुमारे ९३३९९/- रुपये किंमतीचा माल हस्तगत केला आहे. नांगऱ्या उर्फ किरण बनसोडे, दिपक चंद्रपाल उर्फ अतुल वर्मा उर्फ मनजीत सिंग, रॉबिन अरुजा अशी या तिघांची नावे आहेत.

याबाबत वृत्त असे आहे कि, ई – कार्ट लॉजिस्टिक प्रा. लिमिटेड कंपनीच्या डिलेव्हरी बॉयने फ्लिपकार्ट कंपनीकडून ऑर्डर करण्यात आलेले ४४,९००/- रुपयांचे अँपल वॉच सिरीयल – ७, जीपीएस अँपल वॉच हे कंपनीकडून आलेले पार्सल डिलिव्हरी करण्यासाठी आला असता, शिपमेंटच्या वस्तू पेक्षा कमी पैसे असल्याचा बहाणा करून; त्यांना पैसे मोजण्यामध्ये गुंतवून डिलिव्हरीचे पार्सल त्यांच्यापासून दूर नेऊन त्यामधील वॉच काढून घेऊन त्याऐवजी साबणाच्या वड्या ठेऊन फसवणूक केल्याबाबत ई – कार्ट लॉजिस्टिक प्रा. लिमिटेड कंपनीचे डिलेव्हरी बॉय अविनाश वाकळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिसांनी तपास करून मिळालेल्या गोपनीय बातमीच्या आधारे नांगऱ्या उर्फ किरण बनसोडे, दिपक चंद्रपाल उर्फ अतुल वर्मा उर्फ मनजीत सिंग, रॉबिन अरुजा या तिघांना अटक केली. सदर प्रकरणी पोलिसांनी त्यांच्याकडून मोबाईल, वॉच, लॅपटॉप असा एकूण ९३३९९/- रुपयांचा माल हस्तगत केला.
दरम्यान, सदर आरोपी हे सराईत गुन्हेगार असून, त्यांच्यावर यापूर्वी डोंबिवली, अलिबाग आणि सातारा जिल्ह्यात गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याकडे मिळून आलेल्या लॅपटॉप बाबत अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून, आरोपी नगरया उर्फ किरण बनसोडे हा मानपाडा पोलीस ठाण्यात (डोंबिवली) एका दाखल गुन्हयात पाहिजे आरोपी आहे.
तसेच यापूर्वी त्यांनी डोंबिवली, ठाणे, मुंबई, नवी मुंबई, अलिबाग, सातारा, गणपती पुळे, कनोर, राज्य केरळ, गुजरात, विशाखापट्टणम, मध्य प्रदेश याठिकाणी अशा प्रकारे फसवणुकीचे प्रकार केले असल्याचे सांगितले. व आणखी ६ आयफोन मिनी मोबाईल फोनच्या ऑर्डर कासारवडवली व हिरानंदानी परिसरात दिल्या होत्या. परंतु तात्काळ आरोपी अटक झाल्याने कंपनीचे सुमारे २०७३९६/- रुपयांचे नुकसान वाचविण्यात कासारवडवली पोलिसांना यश आले असून पुढील तपास पोलीस उप निरीक्षक श्री सचिन सरडे करत आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे