Breaking
ब्रेकिंग

मिस – मिसेस इंडिया नक्षत्र २०२२ महाअंतिम सोहळा जल्लोषात ठाण्यात संपन्न,नक्षत्र ने दिली नवकलागुणांना संधी…

अमित जाधव-संपादक

0 2 0 9 7 4

 

मिस – मिसेस इंडिया नक्षत्र २०२२ महाअंतिम सोहळा सपन्न

जल्लोषात अवतरले ठाण्यात “नक्षत्र”

बोध इंटरटेन्मेंट आयोजित मिस – मिसेस इंडिया नक्षत्र २०२२ चे आयोजन करण्यात आले. देशभरातुन स्पर्धकांचा उसर्फुर्त प्रतिसाद मिळाला त्यातुन निवड करण्यात आलेल्या स्पर्धकांना महाअंतिम सोहळ्यात संधी मिळाली. तलावांचे शहर, कलाकारांचे माहेर घर असलेल्या ठाण्यातील उपवन येथे रविवार दिनांक १८ सप्टेंबर २०२२ रोजी चौथे पर्व आयोजक सुबोध कांबळे आणि देवेंद्र शिंदे यांच्या संकल्पनेतुन साकार करण्यात आले.
मिस – मिसेस इंडिया नक्षत्र २०२२ च्या स्पर्धेचे परिक्षण आरती बालेरी ( ग्रुमिंग प्रशिक्षक ), सुप्रिया दळवी ( मसेस महाराष्ट्र नक्षत्र ), प्रिया शाहा ( फॅशन डिझायनर ) यांच्या माध्यमातुन करण्यात आले तसेच स्पर्धेतील सहभागी स्पर्धकांना २ दिवसीय ग्रुमिंग प्रशिक्षण आर्चना पवार ( मिसेस इंडिया नक्षत्र २०२१ ) यांच्या मार्गदर्शनातुन मिळाले.
मिस – मिसेस इंडिया नक्षत्र २०२२ च्या महाअंतिम सोहळ्याची सुरुवात राष्ट्रगीत घेऊन करण्यात आली तसेच स्पर्धेची सुरुवात करत मागील वर्षीच्या विजेत्या स्पर्धक सार्था गोरे ( मिस इंडिया नक्षत्र २०२१ ) व अर्चना पवार ( मिसेस इंडिया नक्षत्र २०२१ ) यांनी केली. कार्यक्रमाच्या निवेदनाची धुरा प्रत्यच कार्यक्रमाचे आयोजक सुबोध कांबळे स्वत: ही धुरा सांभाळली, यावेळी राजकीय, सामाजिक, मनोरंजन, पत्रकारीता क्षेत्रातील मान्यवर मंडळीची उपस्थिती महाअंतिम सोहळ्या विशेष ठरली
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव / जेष्ठ माजी नगरसेवक ठा.म.पा. मनोज शिंदे, माजी नगरसेवक संजयजी तरे, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ ( कोकण विभाग / ठाणे शहर अध्यक्ष ) नितिन शिंदे, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ ( ठाणे शहर उपाध्यक्ष / चौफेर वार्ता संपादक ) जितेंद्र पाटील, बेधडक न्युज चे संपादक अमित जाधव, ठाणे वैभव सोशल मिडीया प्रतिनिधी प्रेम,२४ न्युज मराठी बाणा च्या प्रतिनिधी मनस्वी चौधरी यांची उपस्थिती स्पर्धेच मोलाची ठरली तरुण आव्हान, मी सुधारक, न्युज मॉल, डेमोक्रेटीक इंडीया या सर्वांचे आभार आयोजकांनी मानले
स्पर्धेचे विशेष आकर्षण मराठी आणि मल्याळम चित्रपट श्रृष्टीतील अभिनेत्री नम्रता गायकवाड यांची उपस्थिती मुळे खर्‍या अर्थाने नक्षत्र अवतरले. अभिनेत्री नम्रता गायकवाड यांनी निर्मिती केलेल्या “मन घुमतया” या गाण्याचे सादरीकरण मिस – मिसेस इंडिया नक्षत्र च्या मंचावर केले यावेळी अभिनेत्री नम्रता गायकवाड यांच्या सह प्रेक्षकांनी “मन घुमतया” च्या गाण्यावर मनसोक्त नृत्याचा आनंफ घेतला यावेळी हजारोच्या संख्येने प्रेक्षकांची उपस्थिती म्हणजे जणु पर्वणी.
मिस – मिसेस इंडिया नक्षत्र स्पर्धेचे परिक्षक, मान्यवर यांची स्पर्धेचे व आयोजकांचे तोंड भरुन कौतुक केले. या प्रसंगी आयोजक सुबोध कांबळे व देवेंद्र शिंदे यांनी मान्यवर, परिक्षक, प्रेक्षक आणि स्पर्धकांचे देखील आभार मानले.
मिस -मिसेस इंडिया स्पर्धेच्या तीन फेर्‍या एकाच दिवशी प्रेक्षकांच्या समोर पार पडल्या यावेळी प्रेक्षक वर्ग सुध्दा परिक्षकांच्या भुमिकेत होता. स्पर्धकांना रंगभुषा व वेशभुषेचे सुध्दा नियोजन करण्यात आले. रंगभुषाकार मनिषा कदम, साक्षी, दिपाली, कल्पना मारु, जया महेश्वरी, इ. तसेच वेशभुषा फॅशन डिझायनर मुग्धा नारळकर यांच्या संकल्पनेतुन तयार करण्यात आली स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांच्या सादरीकरणावर त्यांचे गुण अवलंबुन देण्यात आले. सब टायटल पदाचे मानकरी वैशाली चव्हाण, स्नेहल अडसुळे, मिना मेरीया, सुप्रिया कांबळे, रेवती अय्यर, हेमलता गुप्ता हे स्पर्दक ठरले, स्पर्धच्या फस्ट रनरअप् हेमलता गुप्ता, सेकंड रनरअप् ग्रीष्मा पाटील ठरल्या तर प्रेक्षकांच्या निवडतुन फेस ऑफ नक्षत्र स्पर्धेचा सुबक मुकुट विरार च्या रेवती अय्यर हिने मिळवीला, तर मिस इंडिया नक्षत्र २०२२ चा विजेते पदाचा मुकुट ठाण्याच्या अनुष्का भुवड यांनी हा बहुमान पटकावला तसेच मिसेस इंडिया नक्षत २०२२ चा विजेते पदाचा मुकुट पुण्याच्या प्रियांका मोरे य‍ांनी बहुमान मिळवला. स्पर्धकांना मुकुट, सन्मानचिन्ह, सॅश, स्पर्धेतील तयार करण्यात आलेल्या फॅशन डिझायनर मुग्धा नारळकर यांच्या संकल्पनेतुन तयार करण्यात आलेले वेस्टर्न कॉस्ट्युम आणि साजेसे अलंकार आयोजकांच्या वतिने देण्यात आले.
तर फेस ऑफ नक्षत्र या विजेती स्पर्धकांस सुवर्ण बाजुबंद देण्यात आला, मिस इंडिया नक्षत्र २०२२ य‍ांस सुवर्ण नेकलेस देण्यात आला तर मिसेस इंडिया नक्षत्र २०२२ च्या विजेती स्पर्धकास सुवर्ण मंगळसुत्र भेट म्हणुन देण्यात आले. शो स्टॉपर अर्चना पवार आणि सार्था गोरे यांना देखिल मुकुट, सॅश आणि सन्मानचिन्ह देउन गौरव करण्यात आला. अश्या रितीने मिस – मिसेस इंडिया नक्षत्र २०२२ चे चौथे जल्लोषात पारपडले आणि अवघे “नक्षत्र” ठाण्यात अवतरले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे