भायखळा रेल्वे स्टेशनवर थरारक घटना,लोकल डब्यात चोरी करून पलायन करणाऱ्या तीन चोरांना पोलिस कॉन्स्टेबल राहुल जाधव यांनी पाटलाग करून पकडले…
अमित जाधव - संपादक
भायखळा रेल्वे स्टेशन (प्रतिनिधि) :- भायखळा ते सी.एस.टी. रेल्वे टर्मिनलला जाणाऱ्या लोकल ट्रेन मध्ये तीन आरोपी ट्रेन मध्ये प्रवास करत करत ट्रेन मधूनप्रवास करणाऱ्या दोन व्यक्तीचे साहित्य चोरून घेऊन पळून जात असताना त्यांना प्रवाशांनी पाहिले व प्रवाशी चोर चोर ओरडू लागल्यावर त्या आरोपीनी ज्या व्यक्तीचे साहित्य चोरले त्यांना चाकू सारख्या टोकदार वस्तुने वार केला, त्यावेळेस त्या ठिकाणी प्लॅटफॉर्म वर असलेले पोलीस कॉन्स्टेबल राहुल संजय जाधव (मुंबई पोलीस) यांनी तात्काळ त्या आरोपीना रंगेहाथ पकडले. सदर आरोपीनी ट्रेन मध्ये प्रवास करणाऱ्या इसमास टोकदार हत्याराने गंभीर जखमी केले, तसेच पोलीस कॉन्स्टेबल राहुल जाधव यांना देखील ब्लेडने वार केला. जखमी इसमाच्या पोटातून रक्तस्त्राव होत होता. त्याच्या हातात हत्यार असताना देखील पोलीस कॉस्टेबल राहुल जाधव यांनी तात्काळ त्यापैकी दोन आरोपीना पकडून भायखळा रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले. सदर आरोपीना पकडताना आरोपीनी जाधव यांना देखील ब्लेडने वार केला. तरी देखील स्वतःच्या जीवाची पर्वा न करीता सदर आरोपीना शीताफीतीने पकडले.