दिवा भाजप च्या वतीने दातीवली तलाव येथे जीतिया व्रत संपन्न, दिव्यातून उत्तरभारतीय शेकडो महिलांचा सहभाग…
अमित जाधव - संपादक
ठाणे, दिवा ता ७ ऑक्टो : भारतीय जनता पार्टी दिवा शहर व श्री साईबाबा चॅरिटेबल ट्रस्ट, दिवा आयोजित जितीया व्रत सोहळा उत्साहात दिवा शहरातील दातीवली तलाव येथे संपन्न झाला. भाजपचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष नरेश पवार आणि रेश्मा नरेश पवार (भाजप जिल्हा कार्यकारणी सदस्य ) यांच्या पुढाकारामुळे उत्तरभारतीय महीलांसाठी जितीया व्रत सोहळा आयोजित करण्यात आला होता. प्रसंगी दिवा शेकडो महीलांनी मोठी गर्दी केली होती. आपल्या मुलांच्या सुरक्षेसाठी तसेच संतती प्राप्तीसाठी, गर्भधारणा सुरक्षित राहण्यासाठी, मुलांच्या जीवनात सुखसमृद्धी येण्यासाठी जिमूतवाहन मुर्तीची पूजा केली जाते. दिव्यातील उत्तरभारतीय महिला जीवितपुत्रिका व्रत (निर्जला व्रत) पाळत हा सोहळा पार पडला.
जितीया व्रतानिमीत्त भाजपचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष श्री नरेश पवार आणि सौ. रेश्माताई पवार यांनी व्रत करणाऱ्या अनेक महिलांचे पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ देवून स्वागत केले. तसेच पूजा करण्यासाठी सर्व महिलांना विशेष ताट सप्रेम भेट म्हणून देण्यात आले.
प्रसंगी भाजपचे उत्तर भारतीय ठाणे जिल्हा शहर मा. अध्यक्ष शैलेश मिश्रा तसेच विजय भोईर, विनोद भगत, सचिन भोईर, समीर चव्हाण, युवराज यादव, शमशेर यादव, अमरनाथ गुप्ता, अशोक गुप्ता, राहुल साहू, धर्मेन्द्र विश्वकर्मा, शैलेश पंडित, अशोक सोलंकी, गौरी शंकर पटवा, क्रांति सिंह, शीला गुप्ता, सुनीता प्रजापति, रेनू यादव, महेंद्र विश्वकर्मा, विद्यासागर दुबे, अमरनाथ गुप्ता, गणेश जयस्वाल, शोनू जायसवाल, अवधराज राजभर, क्रांति सिंह, मंजू पतिराम प्रजापति, शीला गुप्ता आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.