बेधडक ठाणे न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजनगुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

वीस हजारांची लाच घेतेवेळी कल्याण येथील सहायक पोलिस निरीक्षक अटकेत……

अमित जाधव-संपादक

मलंगगडच्या पायथ्याशी असलेल्या उसाटणे गाव येथे एका कंपनीमध्ये अपघात होऊन एका कामगाराचा मृत्यू झाला होता. कंपनीने हलगर्जीपणा केल्याचा ठपका कंपनीवर ठेवत हिललाईन पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षण धनंजय गंणगे यांनी २५ हजार रुपयांची मागणी केली होती. गुरुवारी दुपारी तक्रारदार महिलेने २० हजार रुपयात तडजोड करून पैसे गणगे यांच्या स्वाधीन केले होते. पैसे जवळ असतानाच ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नेवाळी चौकीत प्रवेश करत गणगे यांना ताब्यात घेतले आहे.हिललाईन पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या नेवाळी चौकीत पहिल्यांदाच लाचलुचपत विभागाची कारवाई झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मलंगगडच्या पायथ्याशी असलेल्या उसाटणे येथील एका कंपनीत काही महिन्यांपूर्वी एक अपघात झाला होता. या अपघातात कामगाराला आपला जीव गमवावा लागला होता. यानंतर या कंपनीवर पोलीस प्रशासनाने हलगर्जीपणाचा ठपका ठेवत गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली होती.यानंतर या कंपनी व्यवस्थापनाने गुन्हा दाखल न करण्यासाठी पोलिसांना आर्थिक रसद देण्याचे आश्वासन दिले होते. पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय गणगे यांना गुरुवारी एका महिलेने २० हजार रुपयांची लाच दिली. मात्र, ही लाच स्वीकारत असताना तातडीने ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या यांच्या पथकाने नेवाळी चौकीत धाड टाकत धनंजय घाडगे यांना ताब्यात घेतलं आहे आणि ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पथक या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे