Breaking
ब्रेकिंग

ठाणे जिल्हा होमगार्ड तर्फे ठाणे जिल्ह्यातील पुरुष व महिला अनुशेष भरुन काढण्यासाठी नवीन होमगार्ड सदस्य नोंदणी…

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 5 6

जिल्ह्यात होमगार्ड सदस्य नोंदणी सुरु*

*ठाणे, दि.27(प्रतिनिधि) :-* ठाणे जिल्हा होमगार्ड तर्फे ठाणे जिल्ह्यातील पुरुष व महिला अनुशेष भरुन काढण्यासाठी नवीन होमगार्ड सदस्य नोंदणी करण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज केलेल्या उमेदवारांची कागदपत्र पडताळणी व शारिरीक क्षमता चाचणी घेणे ही कार्यवाही दि.3० सप्टेंबर २०२४ ते दि. 03 ऑक्टोबर २०२४ या कालावधीत भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद, कौसा मुंब्रा, येथील क्रीडा संकुल येथे होणार आहे.
दि.3० सप्टेंबर २०२४ ते दि. 03 ऑक्टोबर २०२४ या कालावधीत सकाळी 06.00 वाजता पुढीलप्रमाणे नमूद केलेल्या दिनांकास भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद, कौसा मुंब्रा, येथील क्रीडा संकुल येथे बोलाविण्यात आले आहे. उशिरा येणाऱ्या उमेदवारांना मैदानात प्रवेश दिला जाणार नाही.
दि.30 सप्टेंबर 2024 रोजी बोलाविण्यात आलेले अर्ज नोंदणी क्रमांक अर्ज क्र.1 ते अर्ज क्र.2724 ठाणे विभाग पुरुष उमेदवार (महिला वगळून), उमेदवारांची संख्या -2 हजार.
दि.01 ऑक्टोबर 2024 रोजी बोलाविण्यात आलेले अर्ज नोंदणी क्रमांक अर्ज क्र.2725 ते अर्ज क्र.5980 ठाणे विभाग पुरुष उमेदवार (महिला वगळून), उमेदवारांची संख्या -2 हजार 583.
दि.01 ऑक्टोबर 2024 रोजी बोलाविण्यात आलेले अर्ज नोंदणी क्रमांक अर्ज क्र.1 ते अर्ज क्र. 1367, पालघर विभाग पुरुष उमेदवार (महिला वगळून), उमेदवारांची संख्या -1 हजार.
दि.02 ऑक्टोबर 2024 रोजी बोलाविण्यात आलेले अर्ज नोंदणी क्रमांक अर्ज क्र. 1368 ते अर्ज क्र.5834, पालघर विभाग पुरुष उमेदवार (महिला वगळून), उमेदवारांची संख्या -3 हजार 608.
दि.03 ऑक्टोबर 2024 रोजी ठाणे जिल्हा सर्व महिला उमेदवार, उमेदवारांची संख्या- 1 हजार 427.
दि.03 ऑक्टोबर 2024 रोजी पालघर जिल्हा सर्व महिला उमेदवार, उमेदवारांची संख्या – 1 हजार 226.
ही नोंदणी फक्त ठाणे जिल्ह्यातील ठाणे विभाग व पालघर विभागातील वसई पथकाकरिता संबंधित पोलीस स्टेशनच्या हद्दीतील रहिवाशी उमेदवारांकरीता आहे. इतर ठाणे व पालघर जिल्हा व्यतिरिक्त इतर जिल्ह्यातील उमेदवारांनी नोंदणी कार्यक्रमाकरिता उपस्थित राहू नये, त्यांना प्रवेश दिला जाणार नाही.
याबाबतची सूचना https://maharashtracdhg.gov.in/mahahg/login1.php या संकेतस्थळावर वेळोवेळी देण्यात येईल. उमेदवारांनी या संकेतस्थळावरील सूचनांकडे लक्ष ठेवावे, असे ठाणे होमगार्ड समादेशक तथा अपर पोलीस अधीक्षक, ठाणे ग्रामीणकरिता श्री. राहुल झालटे यांनी कळविले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 5 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे