पहिल्या भव्य शब्दसुमने साहित्यिक मंच चा राज्यस्तरीय काव्यसंमेलन सोहळा कल्याणमध्ये संपन्न……..
अमित जाधव-संपादक
महिलांना ही साहित्यिक क्षेत्रात स्वत:चे अस्तित्व आहे.याची जाणीव करून देणारा कार्यक्रम दिनांक १८सप्टेंबर२०२१ कल्याणमध्ये लेखिका , कवयित्री अनिता कळसकर यांनी पार पाडला .शब्दसुमने साहित्यिक मंच च्या संस्थापिका अनिता कळसकर यांनी त्यांच्या पहिल्या शब्दसुमने साहित्यिक मंचच्या राज्यस्तरीय काव्यसंमेलनाचे आयोजन सार्वजनिक वाचनालयात केले होते या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कल्याण प.चे मा.आमदार सन्मा. श्री . नरेंद्र पवार होते .या कार्यक्रमाचे निवेदन
जनशक्ती च्या अॅंकर सौ .ललिता मोरे तसेच
शिल्पा परूळेकर पै या दोघी होत्या .या दोघींनी आपल्या काव्यमय शब्दांनी रसिकांना खिळवून ठेवले . या कार्यक्रमाच्या सर्वोसर्वा कवयित्री अनिता कळसकर यांनी शब्दसुमने साहित्यिक मंच च्या पहिल्या राज्यस्तरीय काव्यसंमेलनाचे दोन सत्रात विभागणी केली होती.पहिले सत्र ऋतूरंग आणि दुसरे सत्र अंतरंगातील पाऊस असे होते . पहिल्या सत्राचे अध्यक्षस्थानी कवी अक्षरानंदचे संपादक मा.श्री.योगेश जोशी तर दुसरा सत्राचे अध्यक्ष सुप्रसिद्ध लोककवी श्री.प्रशांत मोरे हे होते. निमंत्रित कवी/कवयित्री मध्ये सौ.सुनिता बोरसे यांनी
आपल्या भक्तीने आनंद वाढवला तसेच परखडपणे कवितेच्या माध्यमातून संवेदना शब्दखड्गचे संपादक श्री दीपक जाधव यांनी मांडल्या .श्री प्रविण जोशी यांनी कोरोनाच्या काळातल्या मानवावर ओढवलेल्या प्रसंगाची व्यथा व्यक्त केली .अनेक कवी/कवयित्री यांनी यात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला .श्री प्रशांत मोरे यांनी काव्यमय शब्दांनी आपल्या ढंगात कवितेचे गायन करून रसिकांची मने जिंकली.आयोजन करणा-या कवयित्री अनिता कळसकर यांनी आपल्या शब्दसुमने साहित्यिक मंचावरून नवोदित साहित्यिक यांना ही संधी उपलब्ध करून दिली . त्यामुळे सर्वांचा आनंद ओसंडून वाहत होता.दुपारचे स्नेहमय भोजनानंतर *अंतरंगातील पाऊस* या दुसऱ्या सत्रात रसिकांनी कार्यक्रमाचा पुरेपूर घेतला .अनिता कळसकर यांनी प्रमुख पाहुणे मा.आमदार श्री.नरेंद्र पवार साहेब आवर्जून उपस्थित राहिले म्हणून त्यांचे आभार व्यक्त केले .तसेच सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.तसेच मा.नरेंद्र पवार सरांनी कार्यक्रमास भरभरून शुभेच्छा दिल्या.तसेच त्यांनी शालेय जीवनातील काही आठवणींना उजाळा मिळाला, म्हणून अनिता कळसकर ताईंचे ही कौतुक केले .
सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष मा.ज्येष्ठ कवी राजीव जोशी यांनी कार्यक्रमास सहकार्य केले . काव्यसंमेलनाला लाभलेले विशेष अतिथी नेफडोचे कोकण विभाग अध्यक्ष तसेच महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष श्री.प्रकाश कदम .अपंग विकास संघाचे अध्यक्ष श्री.अशोक भोईर , रंगकर्मी श्री.सुधीर चित्ते या सर्वांचे अनिता कळसकर यांनी सन्मानचिन्ह पुष्प गुच्छ तसेच देऊन सत्कार केला.तसेच सहभागी६०कवी/कवयित्री यांना सन्मानपत्र , सन्मानचिन्ह देऊन गौरव केला .तसेच निवेदिका सौ ललिता मोरे आणि सौ शिल्पा परूळेकर पै यांना ही शाल, पुष्पगुच्छ, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह देऊन गौरविले .दोन्ही ही निवेदिकांनी अनिता कळसकर या एकट्या कवयित्रीने सर्व नियोजन व्यवस्थित व चोखपणे वेळेत पार पाडण्यासाठी केलेल्या धावपळीचे कौतुक केले.
शब्दसुमने १ल्या राज्यस्तरीय साहित्यिक या काव्यसंमेलनात महाराष्ट्रातील अनेक कवी /कवयित्री सहभागी झालै होते ,पुण्यावरून शरयू कुलकर्णी , डोंबिवली वरून सौ.शुभदा देशपांडे, सौ अश्विनी मुजुमदार,दिपश्री इसामे,यशवंत माळी तानाजी शिंदे ,डाॅ.ईशा कुलकर्णी,भाग्यश्री हिरे ,उमाकांत आदमाने ,अवधूत शेलार,सुरेखा गायकवाड, बापूसाहेब सोनावणे-,विजया शिंदे ,पत्रकार ,कवी ,
दीपक जाधव ,प्रविण देशमुख, श्रद्धा खानापूरकर,मधूरा खाडे,प्रभावती पाटील,प्रदीप बडदे,राहुल अलगुडे,दर्शन बोटेकर,माधूरी शिंदे -,आदी अनेक साहित्यिक उपस्थित होते.तसेच या कार्यक्रमास कवी संजय तांबे यांचे ही सहकार्य लाभले .सर्वांनी अनिता कळसकर ताईंचे कौतुक करून या काव्यसंमेलनाचा पुरेपूर आस्वाद घेतला . पत्रकार बंधूंनी ही या कार्यक्रमास आवर्जून उपस्थिती दर्शविली.शेवटी सर्वांचे अनिता कळसकर यांनी आभार मानून कार्यक्रम ची सांगता करण्यात आली .