मेष्टा ने आर टी इ च्या प्रवेश प्रक्रिये समस्ये विषयी घेतली शिक्षण मंत्र्यांची भेट… मागण्या मान्य करत कर्नाटक च्या धर्तीवर आर टी इ प्रवेश प्रक्रिया राबवण्यात यावी असे मेष्टा चे मत…
अमित जाधव-संपादक
मेष्टा ने आर टी इ च्या प्रवेश प्रक्रिये विषयी घेतली शिक्षण मंत्र्यांची भेट…
मागण्या मान्य करत कर्नाटक च्या धर्तीवर आर टी इ प्रवेश प्रक्रिया राबवण्यात यावी– मेष्टा
मेष्टा च्या पद्धधिकार्यांनी शिक्षण मंत्री मा.दीपक केसरकर यांची भेट घेत आर टी इ प्रवेश प्रक्रियेच्या विषयी व ठाणे जिल्ह्यातील शाळेच्या समस्ये विषयी चर्चा करत मोर्चात होणाऱ्या सर्व मागण्या मान्य करत शिक्षन मंत्र्यांनी सभांधित सचिवांना ठाणे शिक्षण अधिकारी यांना वादग्रस्त पत्र रद्द करण्याचे आदेश देत कर्नाटक धर्तीवर आर टी इ प्रवेश प्रक्रिया राबवण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यास सांगण्यात आले व आर टी इ प्रतिपूर्ती रक्कम मंजूर करून जिल्ह्यातील शाळेना वाटप करण्याचे आश्वासन देण्यात आले.मंत्री महोदयांनी दिलेल्या आश्वसन मान्यकरून मेष्टा पदाधिकाऱ्यांनी मोर्चास स्थगित करण्यात आला.
प्रसंगी भाजप आमदार संजय केळकर,कोकण विभागाचे पदवीधर आमदार.निरंजन डावखरे ,मेष्टा महासचिव विनोद कुलकर्णी ,ठाणे जिल्हा अध्यक्ष-नरेश पवार व मेष्टा चे आधी पद्धधिकारी या वेळेस उपस्थित होते.मेष्टा ठाणे जिल्हा अद्यक्ष नरेश पवार यांनी सर्वांचे सहकार्य केल्याबद्दल आभार मानत या पुढेही मेष्टा कडून शाळेच्या विविध समस्येसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल असे सांगितले व मोर्चा स्थगित करण्यात आला