ब्रेकिंग
लोकल ट्रेनमधील थरारक घटना, ठाणे स्थानकादरम्यान पाळत ठेवलेल्या एका चोरट्याने त्यांच्या हातावर लाकडाने केला हल्ला,चोरट्याने केलेल्या हल्यात गेला तोल अन् गमावले दोन्ही पाय..
अमित जाधव - संपादक
चोरट्याने केलेल्या हल्यात गेला तोल अन् गमावले दोन्ही पाय
एका चोरामुळे एका प्रवाशाला त्याचे दोन्ही पाय गमावले लागले. जगन जंगले हे दादरमधून कल्याणसाठी रात्री लोकलने निघाले होते. तेव्हा डब्याच्या दरवाजाजवळ मोबाईल घेऊन ते थांबले. ठाणे स्थानकादरम्यान पाळत ठेवलेल्या एका चोरट्याने त्यांच्या हातावर लाकडाने हल्ला केला. यामुळे तोल जाऊन जगन हे खाली पडले. त्याच वेळी लोकलचे चाक त्यांच्या दोन्ही पायांवरुन गेले. त्यांचे दोन्ही पाय शस्त्रक्रिया करुन कापण्यात आले.