ठाणे (24 मे ) : ठाणे शहरातील दिवा प्रभाग समिती अंतर्गत निळजे येथून दिवा जुन्या प्रभाग क्र. २७ व २८ करीता ५०० मी.मी. व्यासाच्या मुख्य जलवाहीनीव्दारे पाणी पुरवठा करण्यात येतो. सदर जलवाहीनीवर उसरघर रेल्वे कल्व्हर्ट पलावा सिटी कंपाऊन्ड, येथे मोठ्या प्रमाणात गळती सुरु झाली असल्यामुळे परिसरात वारंवार कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. त्या अनुषंगाने मुख्य जलवाहीनीला झालेली गळती थांबविणे अत्यावश्यक असून मुख्य जलवाहीनी वरील गळती बंद करण्याकरीता दि. २६/०५/२०२३ रोजी सकाळी १०.०० ते सायं ६.०० या वेळेत ८ तासाकरीता दिवा शहरातील प्रभाग क्र. २७ व २८ करीता होणारा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.
सदर परिसरातील पाणी पुरवठा सुरु झाल्यानंतर पुढील ०१ ते ०२ दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होईल. तरी नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करून ठेवावा.
सदर गळतीचे काम पूर्ण झाल्यावर दिवा प्रभाग समिती अंतर्गत आगासन, बेतवडे, गणेश नगर, बेडेकर नगर, म्हसोबा नगर, शांती नगर, बि.आर. नगर, मुंब्रादेवी कॉलनी, साबे गाव, व दिवा पश्चिम इ. परिसरसताल पाण्या संबंधित तक्रारी कमी होण्यास मदत होणार आहे. तरी दुरूस्तीच्या कामासाठी नागरिकांनी महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.