Breaking
आरोग्य व शिक्षणकृषिवार्ताक्रिडा व मनोरंजनगुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

संदप येथील खदाणीत झालेल्या दुर्घटनेचे गांभीर्याने दखल घेऊन,कल्याण डोंबवली महापालिकेने दिली पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध………

अमित जाधव-संपादक

0 2 0 9 7 4
  1. देसलेपाड्यातील नागरिकांसाठी आजपासून 5000 ली. क्षमतेच्या दोन टाक्यांद्वारे पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध!

डोंबिवली मधील देसले पाड्यातील एका कुटुंबातील पाच व्यक्तींचा काही दिवसांपूर्वी संदप येथील खदानीच्या पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला होता, सदर ठिकाणच्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी डोंबिवली पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता यांना सदर ठिकाणाची पाहणी करून त्वरेने उपायोजना करणे बाबत निर्देशित केले होते.

त्या अनुषंगाने कार्यकारी अभियंता किरण वाघमारे यांनी सदर स्थळाची पाहणी केली आणि पाण्याची टंचाई जाणवणाऱ्या गायकवाडवाडी देसले पाडा या ग्रामीण भागात आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या निर्देशानुसार त्वरित 5000 ली. क्षमतेच्या पाण्याच्या टाक्या बसविण्याची व्यवस्था केली केल्याने सदर परिसरातील रहिवाशांना पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध झाली आहे.
महापालिका आयुक्त यांच्या आदेशानुसार पुढील आठवड्यात संदप येथील खदानीजवळही 5000 लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाक्या बसवून पंपाद्वारे पाणी पुरवठा करण्याची सोय केली जाणार आहे, त्यामुळे पाण्याचे दुर्भिक्ष जाणवणाऱ्या या ग्रामीण परिसरातील नागरिकांना सध्याच्या उन्हाळ्याच्या दिवसात मोठा दिलासा मिळणार आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे