Breaking
क्रिडा व मनोरंजनगुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

नौपाडा पोलीस स्टेशनच्या आवारात पुन्हा सापडला विषारी साप…

अमित जाधव-संपादक

0 2 0 9 7 4

नौपाडा पोलीस स्टेशनच्या आवारात पुन्हा सापडला विषारी साप

पुन्हा एकदा नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये रात्री 12:10 च्या सुमारास रूम नंबर 3 च्या खिडकीत पोलीस स्टेशन च्या मागच्या झुडपात पोलीस हवालदार सुनील पवार यांनी सापाने उंदीर तोंडात पकडल्याचे पाहिले, त्यांनी वागळे पोलीस स्टेशन चे सर्पमित्र तथा प्राणीमित्र ज्ञानेश्वर शिरसाट यांना पाचारण केले, त्यांनी स्वतः चा जीव धोक्यात घालून अत्यंत विषारी अश्या साडेचार फूट (4.5 )घोणस प्रजातीच्या सापाला रेस्क्यू केले व सापाला जीवदान दिले।
घोणस ला इंग्रजी मध्ये रस्सल वायपर म्हणतात , हा विषारी प्रवर्गात मोडणारा सर्प आहे। त्याला ओळखण्याची खूण म्हणजे त्याच्या अंगावर साखळी प्रमाणे रुद्राक्षाच्या आकाराएव्हढे ठिपके असतात, हा साप निशाचर असल्याने शक्यतो रात्रीच आपले भक्ष्य शोधायला बाहेर पडतो। हा साप चिडल्यावर स्वतःचा अंगाला वेटोळे करून बसतो व कुकरच्या शिट्टी सारखा आवाज काढतो। हा साप चावल्यावर आवळपट्टी बंधू नये। त्याचे विष हे अत्यंत विषारी असून मास सडवून टाकते व चावलेला भाग निकामी होऊ शकतो , व वेळीच उपचार नाही केला तर माणूस दगाऊ शकतो।
प्राणीमित्र शिरसाट यांनी यापूर्वी अनेक विषारी व बिनविषारी सापांना व पशु पक्ष्यांना जीवदान दिले आहे।
10 दिवसातील ही दुसरी घटना असल्याने पोलीस स्टेशनमध्ये सद्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। ज्ञानेश्वर शिरसाठ हे सद्या जीवोहम चॅरिटी ट्रस्ट च्या माध्यमातून सामाजिक कार्य करत आहेत।त्यांचा कार्याला सलाम आहे
@megacitylive
#naupadapolice #thanecity

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे