Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

मानव विकास संरक्षण समिती (नवी दिल्ली)महिला पदाधिकारी वर्गाने पोलीस बांधवांसोबत साजरी केली रक्षबांधन….

अमित जाधव-संपादक

0 2 0 9 7 4
मानव विकास संरक्षण समिती* , *नवी दिल्लीच्या* वतीने राष्ट्रीय अध्यक्ष *श्री विजयजी कुराडे साहेब* यांच्या मार्गदर्शनाखाली दि. 10.08.2022 रोजी कर्तव्यावर असणारे पोलीस जवान व इतर शासकीय कर्मचारी यांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी जाऊन रक्षाबंधनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात करण्यात आला. यावेळी ठाणे येथील वागळे इस्टेट पोलीस ठाणे, नौपाडा पोलीस ठाणे, वर्तक नगर पोलीस ठाणे व राबोडी पोलीस ठाणे, देवनार पोलीस ठाणे, मुंब्रा व दिवा पोलीस ठाणे व पालघर जिल्ह्याच्या वतीने वाडा एस. टी. डेपो येथील कार्यरत वाहक, चालक व इतर अधिकारी व कर्मचारी यांना सुद्धा राखी बांधून रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. यावेळी मानव विकास संरक्षण समितीच्या ठाणे विभागातून महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्षा सौ. इंदू यादव, ठाणे जिल्हा महिला अध्यक्षा सौ. रेणू पालेकर, सौ. मोना नायर, सौ पुष्पा राठोड व प्रिया मोरे इ. महिलांनी कर्तव्यावर असणा-या पोलीस जवानांना राख्या बांधल्या. देवनार विभागातून दमयंती म्हात्रे, सरिता सलढाना, रिंकल खरे, शबनम शेख दिवा व मुंब्रा विभागातून अंजना पवार, माधुरी साळुंखे व इतर. वाडा पालघर विभागातून शीतल पाटील, तेजस्विनी डोहाळे या सर्व महिला पदधिका-यानी आपल्या विभागात कार्यरत असलेले पोलीस जवान व शासकीय कर्मचारी यांना राख्या बांधून रक्षाबंधन हा कार्यक्रम साजरा केला.
यावेळी त्यांच्या सोबत श्री रविदास बाविस्कर, कोअर कमिटी अध्यक्ष, श्री रवींद्र गव्हाळे, कोअर कमिटी सल्लागार, श्री शरद जाधव, श्री दुष्यंत डिंगणे, श्री जीवन वांगेकर, श्री चंद्रकांत शेलार, श्री प्रल्हाद सावंत, श्री काशिनाथ पटारे व श्री कैलास बागुल हे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे