Breaking
ब्रेकिंग

कल्यान ग्रामीण विधान सभा ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार सुभाष भोईर यांची प्रचार महायात्रेत नागरिकांचा स्फूर्त सहभाग…

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4
कल्याण ग्रामीण चे विधान सभा उमेदवार सुभाष भोईर यांची प्रचार महायात्रा  ठिकठिकाणी जनसामान्यांशी सुसंवाद साधत पुढे पुढे नेत सर्वसामान्यांशी भेट घेत आहे महाविजयाच्या जनमनात आपलं स्थान अढळ करण्यासाठी आयुष्याची ४० वर्षे मी झटलो, माझ्या बरोबर उभे राहत या समाज कार्यात तुम्हीही मला साथ दिलीत. जनमनात आपण आहोतंच, आता बाळासाहेबांची, क्रांतीची, महाविकासाची, निष्ठेची मशाल आपल्याला घराघरापर्यंत पोहचवायची आहे. हाती अवघे काही दिवस उरले आहेत. आता विधानसभेवर भगवा फडकवल्याशिवाय, महाविजय मिळवल्याशिवाय थांबायचं नाही. या सत्याच्या, निष्ठेच्या महायात्रेत मोठ्या संख्येने सर्वांनी सहभागी व्हा, असं मी सर्वांना आवाहन त्यांनी यावेळी केले आहे
या महायात्रेत सहभागी झालेले महाविकास आघाडीचे सर्व नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सर्वसामान्य जनता यांचे मी आभार मानतो. पुढील काही दिवस आपल्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचे आहे आणि आपल्या विचारांची सत्याची निष्ठेची मशाल तेवत ठेवली पाहिजे आपल्या एकजुटीचे बळ एकवटून कल्याण ग्रामीण मतदार संघावर महाविजयाचा भगवा फडकवूया.असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले  या मातीचा सच्चा भूमिपुत्र जनतेच्या साथीने महाविजयाच्या ध्येयाला गवसणी घालणार शिवसेनेची ‘ मशाल ‘ क्रांती घडवणार असे निष्ठावंत कार्यकर्ते व पदाधिकारी यावेळी घोषणा देत होते
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे