ब्रेकिंग
दिवा साबे गावातील रहिवाशीयांना आनंदाची बातमी , पर्यायी रस्त्याची समस्या कायमस्वरूपी सुटली, दोन नवीन रस्त्यांचे लवकरच काम सुरू…
अमित जाधव - संपादक
दिवा साबेगाव लवकरच साबेगावाचा पर्यायी रस्त्याचा मार्ग मोकळा होणार….
मुख्यमंत्री मा.श्री.एकनाथ शिंदे व कार्यसम्राट खासदार डॅा.श्रीकांत शिंदे यांच्या निधितुन मा.उपमहापौर,दिवाशहर प्रमुख रमाकांत मढवी यांच्या व शिवसेनेचे नगरसेवक आणि पदाधिकार्यांच्या प्रयत्नातून दिवा स्टेशनची वाहतुक कोंडी लक्षात घेता साबे विभागातील लोकांसाठी लवकरच दोन नवीन रस्ते स्मशान भुमी साबे ते वैभव ढाबा आणि दुसरा रस्ता स्मशान भुमी च्या मागच्या बाजूकडील गणेश मंदीर ते नॅशनल स्कुल साळवी नगर जवळील रस्ता लवकरच नवीन रत्याचे काम सुरु करण्यात येणार आहे.रस्त्याच्या जागेची पाहणी करताना माजी उपमहापौर रमाकांत मढवी ,निलेश पाटील,संतोष गुप्ता ,सोनी व महापालिकेचे अधिकारी व ठेकेदार उपस्थित होते. यामुळे साबे गाव रहिवशियानी आनंद व्यक्त करत श्री.निलेश पाटील व रमाकांत मढवी यांचे आभार मानले