Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

लिट्ल एंजल इंग्लिश स्कूल तर्फे मांजरम येथे शिवजयंती उत्साहात साजरी…

अमित जाधव-संपादक

0 2 0 9 7 4

*लिट्ल एंजल इंग्लिश स्कूल तर्फे मांजरम येथे शिवजयंती उत्साहात साजरी*

नायगाव प्रतिनिधी- विश्वनाथ शिंदे

नायगाव तालुक्यातील मांजरम येथे लिटल एंजल इंग्लिश स्कूल यांच्या तर्फे दि.25 फेब्रुवारी रोजी अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी शाळेच्या विद्यार्थ्यांनी झुलवा या गाण्यावर नृत्य सादर, भाषणे, पोवाडे,समूह गीत, अफजलखानाचा वध, भाला फिरवणे,पारंपारिक नृत्य, लेझिम व विविध सांस्कृतिक कार्यक्रमच्या माध्यमातून शिवजयंती साजरी केली. ह्या शिवजयंती चे नियोजन लिटल एंजल इंग्लिश स्कूलचे सर्वेसर्वा सन्माननीय बालाजीराव शिंदे सर यांनी केले.
यावेळी नांदेड जिल्ह्याचे खासदार मा. प्रताप पाटील चिखलीकर यांची उपस्थिती लाभली, तंटामुक्ती अध्यक्ष मा.शिवराज पाटील शिंदे, सेवा सहकारी सोसायटी चेअरमन मा.विनायकराव पाटील शिंदे, उपसरपंच प्रतिनिधी हाणमंतराव पाटील शिंदे, रोहित कत्ते,दत्तात्रय पाटील गायकवाड, राहुल पाटील शिंदे, संदीप पाटील गायकवाड व गावातील असंख्य शिवभक्त उपस्थित होते.

प्रतिक्रिया-१

*आज माजंरम येथे लिट्ल एंजल इंग्लिश स्कूल मांजरमचे संचालक बालाजी शिंदे व त्यांचे संपूर्ण टीम यांचे करावे तेवढे कौतुक कमीच कारण आज मांजरम गावात पहिल्यांदाच थाटामाटात आणि उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली सर्व विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशातून शिवरायांचा देखावा व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर भाषण ऐकताना अंगावर शहारे येऊ लागली एवढ्या छोट्याश्या विद्यार्थ्यांच्या तोंडून त्यांच्या अंगातील कला व गुणांचा वापर कसा करावा हे बालाजी शिंदे सरांनी मांजरम नगरीमध्ये दाखवुन दिले मांजरम गावातील माझ्यासकट सर्व तरुण व गावकऱ्यांच्या वतीने थाटामाटात शिवजयंती साजरी करायला पाहिजे होती पण ती झाली नाही आणि त्याची उणीव संचालक बालाजी शिंदे सर यांनी भरून काढली त्याबद्दल पुन्हा एकदा त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार*-
शहादत्त पाटील गायकवाड

प्रतिक्रिया_२
“लिट्ल एन्जंल इंग्लिश स्कूल” च्या वतीने आज मांजरम येथे भव्य दिव्य स्वरूपात शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ व मावळ्यांच्या वेशातील विद्यार्थ्यांचा देखावा हा अक्षरशः डोळ्याचे पारणे फेडणारा होता. लहान विद्यार्थीच्या वेशभूषा पाहता शिवशाही जणू मांजरमच्या रस्त्यावर उतरल्याचा भास गावातील नागरिकांना झाला. “मी शिवाजी राजे भोसले बोलतोय” चित्रपटातील पोवाड्यावर अफझलखान वधावर आधारीत रादरीकरणात विद्यार्थ्यांनी केलेला अभिनय अंगावर शहारे आणणारा तर होताच परंतू त्याचबरोबर सद्यपरिस्थितीतील असामाजिक तत्वांचा निषेध नोंदवून शिवसंदेश देणारे हे सादरीकरण होते. शिवजयंतीच्या माध्यमातून अगदी लहान वयात बिंबवलेले हे शिवसंस्कार भविष्यात उत्तम समाज निर्मीतीसाठी नक्कीच मार्गदर्शक ठरतील.
शिवजयंतीचे औचित्य साधत अतिशय कौतुकास्पद उपक्रम राबवून तो यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल
लिट्ल एन्जंल इंग्लिश स्कूलचे संचालक श्री बालाजी शिंदे सर व त्यांच्या संपुर्ण टिमचे मनस्वी अभिनंदन !

– राहुल पाटील शिंदे .

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे