दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी ,या तारखेला मिळणार हॉल तिकीट…
अमित जाधव - संपादक
उद्यापासून म्हणजेच 31 जानेवारीपासून विद्यार्थ्यांना परीक्षेचे हॉल तिकीट उपलब्ध करून दिले जाणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्चमध्ये होणाऱ्या दहावीच्या परीक्षेसाठीचे प्रवेश पत्र विद्यार्थी ऑनलाइन प्राप्त करू शकतात.यासोबतच बोर्डाने यंदाच्या परीक्षेचे काही नियम बदलले आहेत. त्यानुसार परीक्षाचा वेळ दहा मिनिटांनी वाढवून देण्यात आला आहे. यासाठी विद्यार्थी आणि पालकांनीच मागणी केली होती. म्हणून विद्यार्थ्यांना आता परीक्षेसाठी अर्धातास अगोदर परीक्षा केंद्रावर पोहोचावे लागणार आहे
म्हणजेच सकाळी 11 वाजता जर परीक्षा सुरु होणार असेल तर विद्यार्थ्यांना 10: 30 वाजताच परीक्षा केंद्रावर जावे लागेल. तसेच पेपर दुपारी 3 वाजता असेल तर अडीच वाजता केंद्रावर जावे लागेल.हावीच्या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक श्रेणी आणि तोंडी परीक्षा येत्या 10 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. तर लेखी परीक्षेला 26 मार्चपासून सुरुवात होईल. यासाठी विद्यार्थ्यांना उद्यापासून हॉल तिकीट दिले जाणार आहे. हॉल तिकीटासाठी कुठलेही अतिरिक्त शुल्क घेण्यात येणार नाहीत.
यासोबतच बोर्डाने अजून एक नियम बदलला आहे. त्यानुसार आता सीबीएसई बोर्ड आता विद्यार्थ्यांना गुणांची टक्केवारी देणार नाही. तसेच श्रेणीसुद्धा मिळणार नाही. महाविद्यालयात प्रवेश घेताना संबंधित शैक्षणिक संस्था गुण किंवा श्रेणी देणार आहे.