Breaking
ब्रेकिंग

मुंब्रा पोलिस स्टेशनचे डॅशिंग सहाय्यक पोलीस निरीक्षक शहाजी शेळके यांचा ठाणे पोलीस आयुक्तांनी प्रमाणपत्र देऊन केला गौरव…!

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4

ठाणे पोलीस आयुक्तायाच्या वतीने उत्कृष्ट तपासासाठी दिला जाणारा २०२४ मधील उत्कृष्ट तपास प्रमाणपत्र मुंब्रा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शहाजी शेळके यांना मिळाल्याने मुंब्रा ,दिवा शहरवासीय व मित्र मंडळी तेच परिवाराकडून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

ठाणे हद्दीतील दिवा शहर म्हातार्डी गाव, येथे सन २०२१ मध्ये घरामध्ये खेळायला आलेल्या चार वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर कुणीही नसल्याचा फायदा घेत लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीस अटक करून मुंब्रा पोलिस स्टेशन अंतर्गत सहायक पोलीस निरीक्षक शहाजी शेळके यांनी उत्कृष्टरित्या तपास करत आरोपीस गुन्हा २४/२०२१ पोक्सो व अट्रासिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. शेवट पर्यंत न्यायालयात भक्कमपणे पुरावे सादर केले अखेर आरोपीस ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाने द्रव्यदडासह २० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावत पीडित मुलीच्या कुटुंबीयांना न्याय दिला.
गुंन्ह्याचा तपास दोषसिद्धी बाबत ठाणे पोलीस आयुक्त श्री.अशितोष डुंबरे यांच्या हस्ते दिनांक ६ एप्रिल २०२४ रोजी सहायक पोलिस निरीक्षक शहाजी शेळके यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे