दिव्यात शिवसेना तिसाईनगर शाखेच्या वतीने भव्य दिव्य शिवजयंती उत्सव साजरा…
अमित जाधव - संपादक

ठाणे, दिवा ता १७ मार्च – दिव्यात शिवसेना तिसाई नगर शाखा आयोजित शिव जन्मोउत्सव फाल्गुन कृष्ण 3 शके शिव छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या उपस्थिती मध्ये मोठ्या उत्साहात व थाटामाटात साजरा करण्यात आला आहे. प्रसंगी माजी उपमहापौर रमाकांत मढवी यांच्या उपस्थित सर्व मान्यवरांचे यावेळी स्वागत करण्यात आले. तसेच दिव्यातील शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप करून विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तिसाई नगर शिवसेना शाखाप्रमुख निलेश म्हात्रे यांचे आयोजन होते.
दिव्यातील शेकडो शालेय विद्यार्थी, महिला वर्ग सामील होत लेझीम नृत्यात सहभागी झाल्या तर पारंपरिक वेशभूषा करुन ढोल ताश्यांचा गजरात मिरवणूक काढण्यात आल्या. छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती आज आयोजित करण्यात आली आहे. महाराजांची जयंती म्हणजे शिवरायांची किर्तीच एवढी अगाध आहे आणि त्यांचा प्रताप सूर्य, चंद्रासारखा मोठा आहे. छत्रपती शिवाजी महाराज असे राजे होऊन गेले की, त्यांचा इतिहास अजरामर झाला आहे. त्यांच्या किर्तीवर पराक्रमावर, त्यांच्या आयुष्यातील घटनांवर आणि मावळे सरदारांसह एकूणच शिवरायांच्या जीवनावर अनेक चित्रपट, नाटके प्रदर्शित झाली आहेत असे यावेळी आयोजक निलेश म्हात्रे यांनी बोलताना स्पस्ट केले आहे प्रसंगी सर्व उपशाखा प्रमुख, गट प्रमुख,महिला शाखा संघटक, उपसंघटक आदी शिवसैनिक, पदाधिकारी व महिला मंडळ यावेळी उपस्थित होते.