Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

गुणवंत कामगार प्रभाकर कांबळे “यांची. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण च्या वतीने”. “”निवडणूक निर्णय अधिकारी” “पदावर निवड……

अमित जाधव -संपादक

0 2 0 9 7 4

“गुणवंत कामगार प्रभाकर कांबळे “यांची. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण च्या वतीने”. “”निवडणूक निर्णय अधिकारी” “पदावर निवड.
———————————————————-
मुंबई( प्रतिनिधी )विक्रोळी टागोर नगर येथील वनिता फाऊंडेशनचे संस्थापक ,गुणवंत कामगार, प्रमाणित लेखा परीक्षक व सहकार सुगंध मासिक चे प्रतिनिधी प्रभाकर तुकाराम कांबळे यांची नुकतीच राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या वतीने महाराष्ट्र सहकारी संस्था व्यवस्थापक समिती निवडणूक नियम 2019 अन्वे प्राप्त अधिकारानुसार विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था मुंबई विभाग यांच्या कार्यक्षेत्रातील इ वर्ग सहकारी संस्थेच्या निवडणूक प्रक्रिया राबवण्यासाठी “निवडणूक निर्णय अधिकारी “म्हणून निवड करण्यात आली असून त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
महाराष्ट्र राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण यांच्यावतीने महाराष्ट्रातील सहकारी संस्थेच्या व्यवस्थापक कमिटीच्या पंचवार्षिक निवडणूक निर्णय अधिकारी पदाचे अर्ज मागविण्यात आले होते. त्यावेळी मुंबई विभागासाठी सहकारी संस्थेतील निवृत्त अधिकारी ,कर्मचारी, प्रमाणित लेखा परीक्षक, वकील, शासकीय कर्मचारी ,अनुभव प्रमाणपत्र असलेले कर्मचारी अशा 340 जणांचा निवडणूक पॅनल मध्ये समावेश करण्यात आला असून सर्वांनी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी भाईंदर येथे दोन दिवसीय प्रशिक्षण घेण्यात आले असल्याचे प्रभाकर कांबळे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे