Breaking
ब्रेकिंग

दिवा भाजप च्या महीला मोर्चा मंडल अध्यक्षा सपना रोशन भगत यांचां आज वाढदिवस,अनेकांनी दिल्या शुभेच्छा…

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4

सौ सपना रोशन भगत यांनी दिवा महिला मोर्चा अध्यक्ष पदाची धुरा हाती घेतल्यामुळे दिव्यातील हजारो महिला वर्गामध्ये आनंदाचे वातावरण आहे.आदर्श महिला मंडळामार्फत त्यांनी महिलांसाठी भरीव असे योगदान दिलेले आहे.प्रभागातील महिलांसाठी त्यांनी वेळोवेळी आरोग्य धन संपदा या उपक्रमअंतर्गत महिलांच्या आरोग्याची काळजी घेत अनेक आरोग्य शिबिरे आयोजित केली आहे.महिलांसाठी दिव्यात यंदा दीपावली निमीत्त उत्कृष्ट रागोली स्पर्धा आयोजित करून विजेत्या महिलेस रोख रक्कम व सन्मान चिन्ह म्हणून पारितोषिक वितरण करण्यात आले त्यामुळे पुढील वर्षी देखील महिलांचा उत्साह वाढऊन त्यांना प्रोत्साहित केले जाईल असा त्या मागचा उद्देश आहे दिव्यातील महिला या सक्षम सुशिक्षित व सदृढ असून त्यांना योग्य नियोजन करून व्यासपीठ मिळवून देणे अपेक्षित आहे यासाठी महिलांनी पुढे यावे असे यावेळी बोलताना त्यांनी स्पष्ट केले.

राजकीय क्षेत्रातून समाज कार्य करून प्रभागातील परिचित नाव व भावी नगरसेवक असा नागरिकांनी केलेला उल्लेख ही त्यांच्या कामाची पोच पावती आहे   सौ सपना रोशन भगत यांचे वर्चस्व दिसून येते.त्यांनी वेळोवेळी केलेलं समाजकार्य,शिबिरे ,आंदोलन साठी हे महिलांनी व नागरिकांनी अत्यंत जवळून पाहिले आहे असे त्यांच्या निकटवर्तीयांनी सागितले. गडकिल्ले स्पर्धा,रागोली स्पर्धा ,दहावी बारावी विद्यार्थ्यासाठी मार्गदर्शन शिबिरे असेच शेकडो उपक्रम आजही त्या राबवत असून दिव्यातील मुलांना व युवावर्गाला सहकार्य करत आहेत.त्यामुळे आज त्यांच्या जन्म दिवस म्हणून हजारो नागरिक सोशल मीडिया, बॅनर व प्रत्यक्ष भेटून अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे