ब्रेकिंग
कल्याण -शीळ मार्गावरील वहातूक कोंडीमुळे शाळा ही त्रस्त,चक्क काही शाळांनी केली सुट्टी जाहीर…
अमित जाधव - संपादक

कल्याण-शीळ रोडवरील वाहतूक कोंडीमुळे शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. एमएमआरडीए, एमएसआरडीसी, एमएसईबी आणि वाहतूक पोलिस यांच्यात समन्वय नसल्याने वाहतूक कोंडी होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला. वाहतूक कोंडीमुळे सर्वांना मोठा फटका बसत आहे. तसेच आजुबाजूच्या शाळांनाही याचा फटका बसला. या परिसरातील विद्यानिकेतन शाळेने दुपारच्या सत्रातील पाचवी ते आठवीतल्या वर्गातील विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर केली.