बेधडक ठाणे न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजनगुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

एका रिक्षा चालकाच रक्षबधनाच्या दिवशी शहरातील बहिणीनं साठी अनोख गिफ्ट….

अमित जाधव-संपादक

#रक्षाबंधन_निमित्त_बहिणींसाठी_मोफत_रिक्षा_सेवा

दिनांक ११/०८/२०२२ रोजी रक्षाबंधन निमित्त मुंबई मिरा रोड पेणकर पाडा येथे गावातल्या सर्व बहिणीसाठी पेणकर पाडा ते मिरा रोड रिक्षा प्रवास फक्त माझ्या रिक्षा तर्फे मोफत सेवा ठेवण्यात आले,
आज रक्षाबंधन आहे, सगळीकडे ट्राफिक जाम, जिथे तिथे बहिण रिक्षा साठी ताटकळत उभी असणार, मागिल आठवड्यापासुन सिएनजी चे भाव खुप वाढले, जागोजागी खड्डे च खड्डे यामुळे रिक्षाचालकांचे खुप नुकसान होते, त्यामुळे काही ठिकाणी रिक्षा वाले काही भाडे नाकारतात, यांचा फटका किंवा त्रास आजच्या दिवशी बहिणींना होऊ नये, आपण आपल्या गावातल्या बहिणीसाठी काही तरी केले पाहिजे, या करिता मी आज मोफत रिक्षा सेवा देण्याचा निर्णय घेतला

सकाळी ९:४५ वा. पासुन ते संध्याकाळी ७ वा.पर्यत हि सेवा मोफत ठेवण्यात आली.
७४_बहिणींना_मोफत_सेवा_देण्याची_संधी_मिळाली

या सेवेत पेणकर पाडा, राॅयल पार्क, स्रुष्टी म्हाडा,
मिरा गावठण, काशिमिरा, काशिगाव, केतकीपाडा, येथील बहिणींचा सहभाग होता,
#हि_सेवा_लहान_मुलींपासुन_ते_महिला_व्रुध्द_महिला_या_सर्वांना_मोफत_सेवा_दिली.
गणेश मंदिर बस स्टाॅप वरिल प्रवासी, कंपनी गेट स्टैड वरिल प्रवासी, तसेच वाटेत जी बहिण भेटेल
तिला मोफत प्रवास सेवा दिली, स्टेशन वरिल
राॅयल काॅलेज पेणकर पाडा जाण्यासाठी वाट पाहणारे
स्टॉप वरिल प्रवासी तसेच दररोज रस्त्याने कामावर चालत जाणारे धुनी भांडी करणार्या आयांबायां, बहिणींना आज समजावून मोफत रिक्षा सेवेचा लाभ घेण्यास भाग पाडले.आज_प्रत्येक_प्रवासी बहिण_दिलखुलास_हसत_होती,
काहींनी माझे फोटो काढले,
एका मोठ्या बहिणीने सांगितले की माझा कायम आशिर्वाद असेल तुला.
एका बहिणीने मला तिला भाऊ नाही म्हणुन ती ऑफिस मध्ये राखी घेऊन जात होती, त्यातील एक राखी मला बांधली, तिला माझ्या या सेवे बद्दल डोळ्यात आनंदाश्रू आले,आजच्या या सेवेबद्दल मला खुप खुप आनंद_वाटला

हि मोफत सेवा करत असताना मला वाटेत आपल्या गावातले पोलिस पाटिल पांडुरंग कांबडी मामा, मनसेचे करण कांडणगिरे भाऊ, गणेश मंदिर सेवेकरी राजपुरकर मावशी आणि सर्व मित्रांनी माझे कौतुक केले आणि शुभेच्छा दिल्या.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे