विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या वक्तव्या विरोधात दिवा भाजपच आंदोलन
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज
यांच्या बाबत आपत्तीजनक वक्तव्य करणारे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या निषेधार्थ दिवा भाजपने आज दिवा स्टेशन येथे निषेध आंदोलन केले यावेळी अजित पवार यांचा पुतळ्याला चपलीचे जोडे मारून त्यांचा निषेध करण्यात आला ठाणे शहर जिल्हाध्यक्ष व आमदार निरंजन डावखरे व ठाणे शहर आमदार संजय केलकर यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगरसेवक व गटनेते मनोहर डुंबरे परिवहन सदस्य विकास पाटील व दिवा शहराध्यक्ष रोहिदास मुंडे व शीळ मंडळ अध्यक्ष बाळाराम पाटील यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले यावेळी अजित पवार यांच्या विरोधात घोषणा देऊन त्यांच्या पुतळ्याला चकलीचे जोडे मारून त्यांच्या तोंडाला शाई लावून निषेध करण्यात आले यावेळी ठाणे शहर कार्यकारणी सदस्य गणेश भगत अशोक पाटील विजय भोईर ओबीसी मोर्चा उपाध्यक्ष विनोद भगत संघटक सरचिटणीस दिलीप भोईर सरचिटणीस समीर चव्हाण युवराज यादव दिवा युवा मोर्चा अध्यक्ष सचिन भोईर शीळ युवा मोर्च्या अध्यक्ष साहिल पाटील महिला मोर्चा अध्यक्ष ज्योती पाटील सीमा भगत उत्तर भारतीय सरचिटणीस अवधराज राजभर अमरनाथ गुप्ता पंकज सिंग अंकुश मढवी मधुकर पाटील प्रवीण पाटील विजय वाघ आशिष पाटील निलेश भोईर प्रणव भोईर मृणाल भगत गौरव पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते



