Breaking
ब्रेकिंग

कल्याणमधील तरुणीवर अमानुष मारहाण प्रकरण — आमदार राजेश गोवर्धन मोरे यांच्याकडून कडक कार्यवाहीची मागणी, पीडितेला धीर देत..

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4
कल्याण -कल्याणच्या नांदिवली परिसरातील एका खासगी रुग्णालयात घडलेल्या अमानुष प्रकाराने संपूर्ण परिसरात खळबळ उडवली आहे. या रुग्णालयात स्वागतिका (रिसेप्शनिस्ट) म्हणून काम करणाऱ्या एका तरुणीवर बाहेरून आलेल्या गोपाळ झा नावाच्या युवकाने अत्यंत क्रूरपणे हल्ला केला.
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तिने थोड़े  थांबण्यास सांगितल्याने संतप्त झालेल्या त्या युवकाने पीडित तरुणीच्या पोटात जोरात लाथ मारून तिला जमिनीवर आपटले. इतकेच नव्हे तर तीला फरफटत नेले आणि लाथा-बुक्केही मारले यामुळे  तीला गंभीर दुखापत झाली असून तिला शारीरिक वेदना आणि मानसिक त्रास खुप झाला आहे. या अमानुष प्रकारामुळे पीडित तरुणीवर आणि तिच्या कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. या घटनेची गंभीर दखल घेत कल्याण ग्रामीणचे आमदार  राजेश गोवर्धन मोरे यांनी तातडीने पोलिस प्रशासनाशी संपर्क साधत कठोर कारवाईची मागणी केली. संबंधित अधिकारी यांच्याकडून पीडितेला न्याय मिळेल आणि तिच्या कुटुंबाची सुरक्षा सुनिश जाईल, असे ठोस आश्वासनही घेण्यात आले.
आमदार . राजेश मोरे आणि सर्व पदाधिकारी स्वत: त्या रुग्णालयात जाऊन पीडित तरुणीची भेट घेतली, तिची विचारपूस केली आणि तिला धीर देत  आम्ही तुझ्या पाठीशी ठामपणे आहोत असे आश्वासन दिले. यावेळी त्यांच्यासोबत कल्याण ग्रामीणमधील सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
 सदानंद थरवळ ज्येष्ठ नेते,संतोष चव्हाण, शहर सचिव राहुल म्हात्रे, युवासेना सचिव,गजानन व्यापारी, उपशहर प्रमुख दिनेश शिवलकर, उपशहर प्रमुख  संतोष तळशिलकर, उपशहर संघटक
श्री रोहिदास म्हात्रे, उपतालुका प्रमुख,नुकूल गायकर, विभाग प्रमुख, सुधीर पाटील, शाखा प्रमुख
श्री प्रफुल कासार, शाखा प्रमुख, सतीश मोडक, स्वीय सहाय्यक, हर्षवर्धन पालांडे. कविता गावंड जिल्हा संपर्क प्रमुख. इंदिरा भोईर उपजिल्हा संघटक, किरण मोंडकर उपजिल्हा संघटक, कल्पना पाटील तालुका संघटक, अस्मिता खानविलकर विधानसभा संघटक
सौ. केतकी पोवार शहर संघटक आणि महिला आघाडी उपस्थित होते
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे