ब्रेकिंग
आंबेडकर चळवळीतील ख्यातनाम गायिका वैशाली शिंदे यांचे मुंबईतील रुग्णालयात निधन..
अमित जाधव - संपादक
आपल्या बुलंद गायकीने आंबेडकर चळवळीला बळ मिळवून देणाऱ्या गायिका वैशाली शिंदे यांचे आज शुक्रवारी प्रदीर्घ आजाराने दुःखद निधन झाले आहे. वैशाली शिंदे या गेले काही वर्षे मधुमेहाने त्रासलेल्या होत्या, त्यांच्या पायाला गँगरीन झाल्याने त्यांना मुंबईच्या केईएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. गेले काही दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते मात्र यातच त्यांचे निधन झाले असल्याचे समोर आले आहे. वैशाली शिंदे या ६२ वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनाच्या बातमीने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. वैशाली शिंदे यांच्या पश्चात त्यांना एक मुलगाही आहे. आज शुक्रवारी दुपारी १२ वाजता घाटकोपर येथील भटवाडी स्मशानभूमीत वैशाली शिंदे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.