बेधडक ठाणे न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

दिव्यात पाणी टंचाई मुळे नागरिक हैराण,मतदान करून बोटावरची शाई गेली नाही पण पाणी गेलं…

अमित जाधव - संपादक

ठाणे, दिवा ता ७ जून : खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने बुधवार ५ जून पासून दहा टक्के पाणी कपात सुरु करण्यात आली. त्यातच बुधवारी महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाने पाणीपुरवठा कामासाठी शटडाऊन होते ते काम गुरुवारी दुपारी तीन वाजेपर्यंत शटडाऊनचे काम संपले त्यानंतर कमी दाबाने पाणीपुरवठा सुरु करण्यात आला. त्यानंतर शुक्रवारी सकाळी ८ ते ९ वाजता पलावा-निळजे दरम्यान पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला गळती सुरु झाल्याने पुन्हा पाणीपुरवठा बंद करण्यात आला परिणामी दिवा शहराचे पाण्यासाठीचे मेघाहाल सुरूच असलेले पाहवयास मिळाले.

परिणामी दिवा प्रभाग समिती क्षेत्रात बुधवार पासून तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली त्यामुळे दिवेकरांचे पाणी संकट कमी होताना दिसत नसल्याने त्यातच ऐक वर्षांपूर्वी ६०० मी मी व्यासाची नवीन जलवाहिनी टाकूनही पाणीप्रश्न सुटता सूटत नाही. विकतचे पाणीही मिळत नसल्याने दिवेकरांवर मोठी नामुष्की ओढवत आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला नेहमी गळती लागण्याचे संकट कमी होताना दिसत नाही परिणामी दिवेकरांचा पाणीप्रश्न कधी कायमचा सुटेल हा मोठा गहन प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच दिवा शहरातील मुंब्रादेवी कॉलनी परिसरातील रिलायन्स टॉवर, दत्त मंदिर परिसरातील जनता पाणीप्रश्नासाठी लवकरच आंदोलनाचे हत्यार उपसणार असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे