Breaking
ब्रेकिंग

नाशिक अपघातात जखमी असलेल्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी केली विचारपूस शासकीय खर्चाने त्यांच्यावर उपचार, मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांना शासनाकडून प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत…

अमित जाधव-संपादक

0 2 0 9 7 4

नाशिक अपघातात जखमी असलेल्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी केली विचारपूस

नाशिक औरंगाबाद रस्त्यावरील नांदूर नाका येथे बसला झालेल्या दुर्दैवी भीषण अपघातात १३ जणांना आपला जीव गमवावा लागला तर जखमींवर उपचार सूरु आहेत.

या घटनेची तातडीने दखल घेऊन नाशिक येथील दुर्घटनास्थळाला भेट देत प्रशासकीय अधिकारी वर्गाकडून अपघाताबाबत विस्तृत आढावा घेतला. त्यानंतर नाशिक जिल्हा रुग्णालयात जाऊन या दुर्घटनेत जखमी झालेल्या नागरिकांची आस्थेने विचारपूस केली. तसेच शासकीय खर्चाने त्यांच्यावर उपचार करण्यात येतील व गरज पडल्यास खाजगी रुग्णालयात त्यांना दाखल करून त्यांच्यावर उपचार करण्यात येतील असेही स्पष्ट केले.

या घटनेची गंभीर दखल घेऊन मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांना शासनाकडून प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत देण्याचे जाहीर करण्यात आले आहे. तसेच जखमींवर विनामूल्य उपचार करण्यात येतील असेही स्पष्ट केले आहे.

अशाप्रकारच्या दुर्घटना पुन्हा घडू नयेत यासाठी महामार्गावरील ब्लाइंड स्पॉट शोधून ते दूर करण्याचा प्रयत्न करू तसेच क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करत असलेल्या वाहनांची देखील तपासणी करून त्यांच्यावरही प्रतिबंधात्मक कारवाई करू असे यावेळी बोलताना स्पष्ट केले.

याप्रसंगी राज्याचे बंदरे व खनिकर्म मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे, वैद्यकीय शिक्षण व ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, खासदार हेमंत गोडसे, आमदार देवयानी फरांदे, आमदार सुहास कांदे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी.शेखर पाटील, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., नाशिक महापालिका आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, शहराचे पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे, पोलीस अधीक्षक सचिन पाटील तसेच इतर वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे