ठाणे, दिवा ता १२ सप्टेंबर : भाजपने मिशन २०२४ ला सुरुवात केली आहे राज्यातील आगामी विधानसभा,लोकसभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन भाजपने ठाणे जिल्हा पक्ष संघटनेत मोठे फेरबदल केले असल्याचे दिसून येत आहेत. त्याच बरोबर तालुका पातळीवर देखीलअनेक फेरबदल झाले आहे. दिवा शहरात देखील भाजपने मंडळ अध्यक्षासह नवीन कार्यकारणी जाहीर केली आहे. नवनियुक्त ठाणे जिल्हा अध्यक्ष संजय वाघुले यांच्या टीम मध्ये दिव्यातून विजय भोईर यांनी सचिव ,तर रेश्मा पवार, गणेश भगत, विनोद भगत, अशोक पाटील यांची ठाणे जिल्हा सदस्य पदी नेमणूक करण्यात आली तर दिव्यातील मुख्यपदावर दिवा मंडळ अध्यक्ष म्हणून युवानेता सचिन भोईर यांची तीन वर्षासाठी नेमणूक करण्यात आली आहे. यावेळी पहिल्यांदाच दिव्याला युवा नेतृत्व भाजपच्या माध्यमातून लाभले असे असे दिवा भाजपच्या जेष्ठ सभासदांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले आहे.
0
2
0
9
7
4
0
2
0
9
7
4



