ब्रेकिंग
मध्य रेल्वेने काही रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म तिकीट विक्री तात्पुरती बंद..

- मध्य रेल्वेने काही रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म तिकीट विक्री तात्पुरती बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शुक्रवारी (6 डिसेंबर) महापरिनिर्वाण दिन आहे. यानिमित्त होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेकडून हा निर्णय घेण्यात आला. आजपासून ते 9 डिसेंबरपर्यंत सीएसएमटी, दादर, ठाणे, कल्याण, पुणे, सोलापूर, नागपूर आणि अन्य रेल्वे स्थानकांवर ही तिकीट विक्री बंद असेल.