Breaking
ब्रेकिंग

मुंब्रा देवी मंदिर जवळ, मुंब्रा बायपास येथे खडी वाहून नेणाऱ्या चालत्या डंपरला आग..

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4

आज दिनांक ०६/०५/२०२४ रोजी १७:५४ वाजताच्या सुमारास आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे प्राप्त झालेल्या घटनेच्या माहितीनुसार (घटनेची माहिती देणारे:- मुंब्रा अग्निशमन केंद्र)मुंब्रा देवी मंदिर जवळ, मुंब्रा बायपास रोड, मुंब्रा, ठाणे या ठिकाणी *GJ ०३ BY ७८८२ अशोक लेलँड ( माल – ३४ टन वजनी बारीक खडी / मार्ग – वाडा ते एल. एन. टी. प्लांट, नवी मुंबई / वाहनचालक पळून गेला आहे या हेवी डंपरला आग लागली होती. सदर घटनास्थळी मुंब्रा पोलीस स्थानकाचे तसेच शहर वाहतूक पोलीस कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान ०२- फायर वाहन, ०१-रेस्क्यु वाहनासह तसेच आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी ०१- पिकअप वाहनासह उपस्थित होते.सदर घटनास्थळी कोणालाही दुखापत नाही.

सदर घटनास्थळी लागलेली आग अग्निशमन दलाच्या जवानांकडून १८:४५ वाजताच्या सुमारास पूर्णपणे विझविण्यात आली असून, परिस्थिती नियंत्रणात आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे