ब्रेकिंग
दिवा शहर भाजप च्या वतीने भव्य व्यासपीठावर ट्रिकसीनयुक्त दशावतार नाटक अजिंक्यतारा भाग -2 उद्या पहा कोठे ते संपर्ण बातमीत…
अमित जाधव - संपादक
दिव्यात प्रथमच लोकराजा स्व. सुधीर कलिंगन प्रस्तुत कलेश्वर दशावतार नाटय मंडळ नेरूर साचालक श्री. सिद्धेश सुधीर कलिंगण दिव्यात पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी च्या वतीने ट्रिकसीनयुक्त दशावतार नाटक अजिंक्यतारा भाग 2 शनिवारी 25 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7.30 वाजता नागनाथ मंदिर साबे रोड,स्वप्न साकार बंगलाच्या मागेदिवा स्टेशन येथे आयोजित करण्यात आले आहे.
शेष शाही शिवशंकर, अजिंक्यतारा केसरीशुंड वाहनावर बसून आगमन,तुटलेले अवशेष एकरुपी करून रक्त वर्णला जिवंत करणे, कवटी वर शुक्र चार्या ध्यावस्थ ,मानवी बोलके सांगाडे, अजगरातून आसुर निर्मिती,कैलास पर्वत शिव शकर सहित अधांतरी उचलणे, सांभर प्रण्यावरून शुक्रचायचे आगमन, ऐश्वर्य देवता ईश्वर नगरीत विराजमान,शिव शंकराचे विराट रूप,शिव शंकराच्या त्रिशुळातून अग्नी ज्वाला बाहेर येऊन रक्तवर्णलाचा शेवट, रक्तवर्णलाचे विराट रूप,अजिंक्यताराला नवलक्ष , तारांगणात स्थान देणे आदी प्रयोग यंदा पहिल्यांदा दिव्यात भव्य व्यासपीठावर होत आहेत याचा आनंद लुटण्यासाठी दिव्यातील नागरिकांनी मोठया प्रमाणावर उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
आयोजक दिवा शहर भारतीय जनता पार्टी चे अशोक पाटील,विनोद भगत, सीमा गणेश भगत आणि सचिन भोईर हे आहेत.