गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र
कल्याण PWD विभागाचा अभियंता ACBच्या जाळ्यात; लाच घेताना रंगेहाथ पकडले…….
अमित जाधव-संपादक
कल्याण, (ता 13, संतोष पडवळ) :बांधकाम विभागाचा अविनाश भानुशाली या अभियंत्याला एक लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे. कल्याण रायते या गावातील बाधित बांधकामाचे मूल्यांकन देण्यासाठी एक लाखांची लाच मागितली होती. अविनाश भानुशाली हे सार्वजनिक बांधकाम विभाग, कल्याण येथे शाखा अभियंता म्हणून कार्यरत आहेत.
तक्रारदारांच्या मालकीच्या जमीनीवरील बांधकाम हे मुंबई वडोदरा द्रुतगती महामार्गाचे भुसंपादनात जात असल्याने सदर बांधकामांचे मुल्यमापन करुन अहवाल देण्यासाठी लोकसेवक याने दि . ९/९/२१ रोजी पडताळणी दरम्यान यापूर्वी ४ लाख स्विकारल्याचे मान्य करुन आणखी १ लाख रकमेच्या लाचेची मागणी करुन त्याशिवाय अहवाल मिळणार नाही असे सांगितले. त्यावरुन आज सापळा कारवाई दरम्यान लोकसेवकाने स्वत: चे कल्याण येथील कार्यालयात १ लाख रु लाच रक्कम स्विकारल्यावरुन रंगेहाथ पकडले आहे.