बेधडक ठाणे न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

दिव्यात भीषण पाणी टंचाई, ठाकरेंच्या शिवसेनेचा प्रभाग समिती कार्यालयावर धडकला मोर्चा…

अमित जाधव - संपादक

दिवा:- दिव्यातील भीषण पाणीटंचाई अनियमित पाणीपुरवठा व नागरिकांना पाणी नसताना येणारी भरमसाठ बिले या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेने ठाणे महापालिका दिवा प्रभाग समितीच्या कार्यालावर धडक मोर्चा काढला या मोर्चात महिलांची संख्या लक्षणीय होती.

खासदार व शिवसेना नेते राजन विचारे कल्याण लोकसभा संपर्कप्रमुख गुरुनाथ खोत कल्याण जिल्हा प्रमुख सदानंद थरवळ माजी आमदार सुभाषजी भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली
शहर प्रमुख सचिन पाटील दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे,अभिषेक ठाकूर शहर अधिकारी युवा, उपशहर प्रमुख वैष्णव पाटील,नुकत्याच ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केलेल्या तन्वी फाउंडेशनच्या अध्यक्षा ज्योती पाटील,उपशहर संगटिका योगिता नाईक,तेजस पोरजी, मयुरी पोरजी, यांच्या नेतृत्वाखाली ठाकरेंच्या शिवसेनेचे शिवसैनिक व महिला पाणीटंचाईचा जाब विचारण्यासाठी दिवा प्रभाग समिती कार्यालयावरती धडकल्या. ठाणे महापालिकेत शिंदेचे एकहाती सत्ता असतानाही मागील अनेक वर्षे दिव्यातील पाणीटंचाई न सुटल्याने ठाकरेंच्या शिवसेनेने दिवा प्रभाग समितीवर पाण्यासाठी हल्लाबोल मोर्चा काढत प्रभाग समितीवर धडकले.
पाणी चोरी,पाणी लाईन विकणारे दलाल आणि टँकर माफियांना पाणी मिळते मात्र दिव्यातील गोरगरीब जनतेला पाणी का मिळत नाही असा सवाल ठाकरेंच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पालिका अधिकाऱ्यांना चर्चे दरम्यान केला. यावेळी पालिका प्रशासनाने दिव्यातील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू असल्याचे आश्वासन दिले. महिनाभरात दिव्यातील पाणी प्रश्न न सुटल्यास ठाणे महापालिका मुख्यालयावर शिवसेनेचे शिवसैनिक धडक देतील असा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला. दिवा शीळ पाईपलाईन ला माजी आमदार सुभाष भोईर यांनी मंजूर करून आणली,2020 मध्ये वर्क ऑर्डर निघाली तरीही अद्याप काम सुरू झाले नाही दिव्यातील नागरिकांना सुरळीत पाणी पुरवठा होण्यासाठी पाणी चोरांवर कारवाई करा अशी मागणी शहर प्रमुख सचिन पाटील यांनी केली. दिवा शहरातील पाणी टंचाईचा सर्वाधिक फटका हा महिलांना बसत असून विकतचे पाणी घ्यावे लागत असल्याने आर्थिक स्थिती बिघडते परिणामी शहरातील पाणी समस्या निकालात काढावी अशी मागणी ज्योती पाटील यांनी केली. दिवा प्रभाग समिती वरील धडक मोर्चा हा ट्रेलर असून दिवा शहरातील पाणी समस्या न सोडवल्यास ठाणे महापालिका मुख्यालयावर प्रचंड आक्रोश मोर्चा काढण्याचा इशारा ज्योती पाटील यांनी दिला आहे. यावेळी उपजिल्हाप्रमुख विजय देसाई,सहसंपर्क प्रमुख अरविंद बिरमुळे,कल्याण लोकसभा संपर्कसंघटिका मृणाल यज्ञेश्वर,जिल्हा संघटक कविता गावंड,कळवा शहर प्रमुख चंद्रकांत विधाटे,कळवा शहर संघटक रवींद्र सुर्वे,सचिन पाटील शहर प्रमुख,रोहिदास मुंडे शहर संघटक,अभिषेक ठाकूर युवा शहर अधिकारी,
वैष्णव पाटील उपशहर प्रमुख,योगिता नाईक उपशहर संघटिक,प्रियंका सावंत उप शहर संघटिका,शहर सचिव उमेश राठोड,चेतन पाटील विभागप्रमुख,मच्छिंद्रनाथ लाड विभाग प्रमुख,स्मिता जाधव विभाग संघटीका दिवा शहरातील इतर सर्व शिवसेना युवासेना पदाधिकारी युवा उपशहर प्रमुख उपविभाग प्रमुख शाखाप्रमुख उपशाखाप्रमुख गटप्रमुख व तमाम शिवसैनिक उपस्थित होते.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे