Breaking
ब्रेकिंग

रिपब्लिकन(आठवले)दिवा विभागाच्या वतीने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी स्थानिक आमदारांना दिल नवेदन..

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4

दिवा शहरात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभे रहावे यासाठी गेली कित्येक वर्षे आंबेडकरी समाज मागणी करत आहे.रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) दिवा विभाग पक्षाचे वतीने कल्याण ग्रामीण चे स्थानिक आमदार राजेश मोरे यांना या संदर्भात निवेदन देण्यात आले.छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा दिवा चौकात व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा हा स्टेशन परिसरात असावा या संदर्भात आज निवेदन देण्यात आले.दिवा स्टेशन परिसरात ठाणे महापालिकेकडून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळ्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी हि या पत्राद्वारे करण्यात आली.

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारकाची घोषणा दिवा मध्ये होणे अपेक्षित होते परंतु तसं काही झाले नाही व इतर पक्षांची ही त्या संदर्भात काही भूमिका घेतल्या नाहीत.आज आम्ही आमच्या पक्षाचे वतीने दोन्ही स्मारकांची मागणी स्थानिक आमदारांना करतं आहोत.दिवा शहरात छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक हे दिव्यातील लोकांना प्रेरणादायी ठरेल यासाठी हे दोन्ही स्मारके दिवा शहरात असली पाहिजे – दिनेश पाटील (दिवा विभाग अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया)

छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारकाची घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री व आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी दिवा चौकात केली होती याचा सर्व दिवेकर म्हणून आम्हाला आनंद झाला.परंतु डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारकाची घोषणा झाली नाही आंबेडकरी समाजात नाराजगी चा सुर उमटला.आज स्थानिक आमदार राजेश मोरे साहेब यांची भेट घेऊन रिपब्लिकन (आठवले)पक्षाचे वतीने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारका संदर्भात निवेदन देण्यात आले. डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हा दिवा स्टेशन परिसरात असावा अशी मागणी आम्ही आमच्या पक्षाचे वतीने करत आहोत भविष्यात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळ्यासाठी संघर्ष , आंदोलन करावे लागले तरी तयारी आहे आमची- सौरव आढांगळे (RPI-A युवक उपाध्यक्ष दिवा विभाग)

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे